Exclusive: Samsung घेऊन येत आहे स्वस्त डुअल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला फोन, Galaxy A10s ची माहिती झाली लीक

काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती कि लवकरच Samsung स्वस्तात Galaxy A10s भारतात लॉन्च करणार आहे आणि आज या फोन संबंधित खास माहिती आमच्याकडे आहे. कंपनीचा ऑफिशियल पोस्टर आला आहे आणि आम्हाला मिळाला आहे ज्यात या फोनची डिजाइन तुम्ही सहज बघू शकता. पोस्टर मध्ये Samsung Galaxy A10s चा फक्त फ्रंट पॅनल दिसत आहे पण आम्हाला या फोन बद्दल अजून काही माहिती मिळाली आहे. आम्हाला हा पोस्टर ऑफलाइन रिटेल सोर्स कडून मिळाला आहे आणि त्यांनी असे पण सांगितले आहे कि यात डुअल कॅमेऱ्यासह फिंगरप्रिंट स्कॅनर पण असेल. मेमरी आणि प्रोसेसर बद्दल अजूनतरी माहिती मिळाली नाही. पण काही दिवसांपूर्वी आम्ही एक लीक प्रकाशित केले होते ज्यात फोनच्या इतर स्पेसिफिकेशन बद्दल सांगितले होते.

पोस्टर मध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता कि Samsung Galaxy A10s च्या फ्रंट पॅनलवर मोठी स्क्रीन आहे आणि यात इनफिनिटी यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो वाटर ड्रॉप नॉच म्हणून पण ओळखला जातो. तसेच फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे. फोनच्या साइड पॅनल वरून याची बॉडी पॉलिकार्बोनेट प्लास्टिक ची वाटते जशी आपण आधीच्या सॅमसंग फोन मध्ये बघिलती होतीथा. हा थोडा स्लीक आहे.

Samsung Galaxy A10s चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग Galaxy A10s चे स्पेसिफिकेशन पाहता, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 6.2 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. फोन मध्ये तुम्हाला 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली स्क्रीन मिळेल. स्क्रीन प्रोटेक्शन बद्दल माहिती मिळाली नाही.

आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहिती नुसार Samsung Galaxy A10s मध्ये 1.6 गीगाहर्ट्ज प्रोसेसर असेल. हा गीकबेंच वर 2.0 गीगाहट्र्जच्या प्रोसेसर सह लिस्ट केला गेला होता. परंतु लॉन्च मॉडेल वेगळ्या प्रोसेसर सह येऊ शकतो. फोन मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. इतकेच नाही तर फोनची स्टोरेज यूजर्स माइक्रोएसडी कार्डने वाढवू शकतात. तसेच फोन मध्ये फोटोग्राफी साठी मागे डुअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. मागे 13-मेगापिक्सल सह 2-मेगापिक्सलचा कॅमेरा कॉम्बिनेशन असेल. डिवाइस मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.

ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी सोबत वाईफाई पण मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची बॅटरी असू शकते. हा फोन एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित असले आणि यात सॅमसंग चा वन यूआई मिळेल. सिक्योरिटी साठी सॅमसंग Galaxy A10s च्या मागील पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here