एक्सक्लूसिव: या शानदार फीचर्स सह लवकरच भारतात येईल Samsung Galaxy A2 Core, बघा याची किंमत

सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy A2 Core काही दिवसांपूर्वी ब्लूटूथ सर्टिफिकेशन साइट आणि वाई-फाई सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट करण्यात आला होता. आता 91मोबाईल्सला Samsung Galaxy A2 Core ची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्सची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

या किंमतीत होईल लॉन्च
Samsung Galaxy A2 Core एंडरॉयड गो आधारित फोन असेल जो कि भारतीय मार्केट मध्ये रेडमी गो ला टक्कर देईल. तसेच आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार Galaxy A2 Core कंपनी 5,290 रुपयांमध्ये लॉन्च करेल. फोन रेड, डार्क ग्रे आणि ब्लू कलर मध्ये सादर केला जाईल. पण शाओमी ने आपला रेडमी गो स्मार्टफोन भारतात 4,499 रुपयांमध्ये लॉन्च केला होता.

Galaxy A2 Core चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार Samsung Galaxy A2 Core च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 5.0-इंचाचा क्यूएचडी एलसीडी डिस्प्ले आहे. सोबत फोन मध्ये प्रोसेसिंग साठी 1.6गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर एक्सनॉस 7870 चिपसेट मिळेल. तसेच सॅमसंग Samsung Galaxy A2 Core मध्ये 1जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज असेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये रियर आणि फ्रंटला एक सारखा कॅमेरा सेंसर असेल. फोनच्या मागे आणि पुढे एफ/1.9 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Samsung Galaxy A2 Core एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन असेल जो एंडरॉयडच्या 9 पाई ओएस वर सादर केला जाईल. समोर आलेल्या डिटेल्सनुसार Samsung Galaxy A2 Core 141.5 x 70.9 x 9.1एमएम डायमेंशन सह येईल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,600एमएएच ची बॅटरी दिली जाईल.

सॅमसंग Galaxy A2 Core ची डिजाइन
समोर आलेल्या स्पेसिफिकेशन मध्ये Samsung Galaxy A2 Core चा फोटो पण दिसत आहे. ज्यावरून या फोनच्या डिजाइनचा अंदाज लावता येईल. फोन जुन्या जाड बेजल्स वाल्या डिजाइन वर लॉन्च केला जाईल. तसेच याआधी समोर आलेल्या फोटो वरून समजले होते सॅमसंग Samsung Galaxy A2 Core च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो फोनच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली डावीकडे स्पीकर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here