एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम मध्ये असेल पावर बटन वर फिंगरप्रिंट स्कॅनर, बघा रेंडर वीडियो आणि फोटो

जगातील प्रमुख मोबाइल फोन निर्माता कंपनी सॅमसंग दरवर्षी आपल्या जे सीरीज मध्ये काही फोन लॉन्च करते. नुकतेच कंपनी ने भारतात गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे8 आणले आहेत. पण मागच्या काही दिवसांपासून कंपनी च्या दोन नवीन मॉडेल सॅमसंग गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइस बद्दल अनेक बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी हे फोन्स काही सर्टिफिकेशन वेबसाइट वर दिसला होता. तसेच आज 91मोबाइल्स ने आॅनलिक्स च्या सहयोग ने सॅमसंग गॅलेक्सी 6 प्राइम ची रेंडर 3डी इमेज आणि 360 वीडियो लीक केला आहे ज्यात तुम्ही फोनची डिजाइन बघू शकता.

विशेष म्हणजे काही देशांमध्ये सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम गॅलेक्सी जे6 प्लस नावाने पण लॉन्च केला जाऊ शकतो. नावावरून स्पष्ट आहे की सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम/गॅलेक्सी जे6 प्लस यावर्षी मे मध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी जे6 चा अपग्रेडड वर्जन आहे.

डिजाइन पाहता फोटो मध्ये तुम्ही स्पष्ट पणे बघू शकता की सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस मध्ये तुम्हाला इनफिनिटी डिस्प्ले मिळेल. सॅमसंग मुख्यत: 18.5:9 आसपेक्ट रे​शियो वाल्या स्क्रीनचा वापर करतो. तसेच फोन मधील बेजल पण जुन्या गॅलेक्सी जे6 मॉडेल पेक्षा खुप कमी आहेत. खास बाब म्हणजे रेंडर इमेज मध्ये फोनच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा सह सॉफ्ट फ्लॅश उपलब्ध आहे.

कॅमेर्‍याच्या बाबतीत सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस जुन्या मॉडेल पेक्षा खुप अपग्रेडड आहे. मागच्या पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो पण जुन्या मॉडेल मध्ये में सिंगल कॅमेरा होता. सर्वात खास बाब ही की फोनच्या मागच्या पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार फोनच्या डावीकडे देण्यात आलेल्या पावर बटन वर फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. याआधी सोनीच्या महाग फोन मध्ये अशा प्रकारचे इंटीग्रेशन दिसले होते. परंतु सॅमसंग फोन मध्ये हे पहिल्यांदाच होईल.

दिलेल्या फोटो मध्ये फोन च्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम आॅडियो जॅक आहे आणि यूएसबी देण्यात आली आहे तर डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. हा फोन पॉलिकार्बोनेट प्लास्टिक यूनिबॉडी डिजाइन सह येऊ शकतो आणि यात तुम्हाला 6-इंचाची स्क्रीन मिळू शकते. फोन ची लांबी रुंदी 161.6 x 77 एमएम आहे तर जाडी 8.2 एमएम असू शकते.

आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्राइम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. पण जुना गॅलेक्सी जे6 एक्सनोस 7870 चिपसेट वर उपलब्ध होता. त्याचबरोबर हा फोन 3जीबी + 32जीबी आणि 4जीबी + 64जीबी मेमरी सह उपलब्ध होऊ शकतो. फोन मध्ये मेमरी कार्ड स्लॉट असेल.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-पिक्सलचा डुअल रियर कॅमेरा एफ/1.9 अपर्चर सह आणि 8-पिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. कंपनी याला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो सह सादर करू शकते. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी असू शकते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी सर्वात आधी हा भारतात सादर करणार आहे त्यानंतर दुसर्‍या देशांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here