256जीबी स्टोरेज असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एस9 प्लस ची किंमत झाली कमी, बघा नवीन किंमत

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग 20 फेब्रुवारीला गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये कंपनी गॅलेक्सी एस10 सीरीज सोबतच फोल्डेबल 5जी फोन पण लॉन्च करू शकते. आता समोर आलेल्या बातमीनुसार कंपनी ने भारतात गॅलेक्सी एस9+ च्या किंमतीत कपात केली आहे. 91मोबाइल्सला रिटेल चेन सोर्स कडून याची माहिती मिळाली आहे.

आमच्या सोर्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस9+ च्या 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी वेरिएंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. कमी किंमतीसह हा फोन ऑफलाइन मार्केट मध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस9+ च्या नव्या किंमती पाहता याचा बेस वेरिएंट 64जीबी 57,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 128जीबी 61,900 रुपये आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 65,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस9 प्लस तुम्हाला 6.2-इंचाची सुपर एमोलेड क्वॉड एचडी+ स्क्रीन मिळेल. याचे स्क्रीन रेज्ल्यूशन 2960 x 1440 पिक्सल आहे. साधारणत: बेजल लेस डिस्प्ले 18:9 आसपेक्ट रेशियोसह येतात पण या सॅमसंग फोन मध्ये आसपेक्ट रेशियो 18.5 आहे. हा एक्सनोस 9810 चिपसेट सह येतो.

गॅलेक्सी एस9+ मध्ये 12-मेगापिक्सलच्या दोन सेंसर सह एक ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यातील एक टेलिफोटो लेंस आणि एक वाइड-एंगल लेंस आहे. सेल्फी साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी एस9+ मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here