एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी एम20 चा स्क्रीन पॅनल लीक, वाटर ड्रॉप नॉच असलेला फोन आणत आहे कंपनी

काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती की सॅमसंग एम सीरीज मध्ये आपले फोन आणत आहे. याअंतर्गत कंपनी गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सर्वात आधी लॉन्च करणार आहे. कंपनी ने आता पर्यंत याची कोणतीही माहिती दिली नाही पण काही दिवसांपूर्वी आम्ही असा खुलासा केला होता की एम सीरीजच्या दोन्ही फोनची निर्मिती सुरू झाली आहे. या फोन्सची निर्मिती सॅमसंग द्वारा भारतातील ग्रेटर नोएडा फॅक्ट्री मध्ये केली जात आहे. तर आज 91मोबाईल्सला याबद्दल अजून एक आणि मोठा लीक मिळाला आहे. आम्हाला सॅमसंग गॅलेक्सी एम20 चा स्क्रीन पॅनल मिळाला आहे ज्यावरून तुम्ही फोनच्या लुकचा अंदाज लावू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एम20 नॉच स्क्रीन सह सादर केला जाईल. फोटो मध्ये तम्ही बघू शकता. नुकत्याच लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये साइड नॉच म्हणजे इनफिनिटी ओ देण्यात आली आहे. तर या फोन मध्ये मधेच नॉच आहे. सर्वात खास बाब अशी की यावेळी वाटरड्रॉप वाल्या शेप मध्ये इनफिनिटी नॉच देण्यात आली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही एक नजर साइड बेजल वर टाकली तर तुम्हाला दिसेल जुन्या सॅमसंग फोन्सपेक्षा याचे बेजल अजूनच बारीक झाले आहेत तर खालचे बेजल पण खूप बारीक झाले आहेत. आम्हाला हा पॅनल एका अशा सोर्स कडून मिळाला आहे जो सॅमसंगशी संबंधित आहे.

Samsung Galaxy M20 Screen Panel

आम्ही आधीच दावा केला आहे की कंपनी सर्वात आधी एम सीरीज अंतर्गत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सादर करणार आहे आणि हे दोन्ही मॉडेल मास प्रोडक्शन साठी गेले आहेत. तर सूत्रांकडून आम्हाला आज हि माहिती मिळाली आहे की सर्वात आधी कंपनी सॅमसंग गॅलेक्सी एम20 सादर करणार आहे आणि हा फोन जानेवारीमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट करण्यात आला होता. लिस्ट केल्या गेलेल्या फोन मध्ये तुम्ही प्रोसेसर आणि रॅमची माहिती बघू शकता. गीकबेंच वर सॅमसंग गॅलेक्सी एम20 मॉडेल नंबर एसएम-एम205एफ सह लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगच्या एक्सनोस 7885 वर आधारित आहे आणि यात 1.5गीगाहट्र्ज प्रोसेसर क्लॉक स्पीड देण्यात आला आहे. इतर स्पेसिफिकेशन पाहता लिस्ट केलेल्या फोन मध्ये 3जीबी रॅम देण्यात आला आहे.

या सॅमसंग एक्सनोस 7885 चिपसेट मध्ये आॅक्टाकोर (हेक्साकोर + डुअल कोर) प्रोसेसर आहे. एक 2.2गीगाहट्र्ज कोर्टेक्स-ए73 डुअल कोरला सपोर्ट करतो करतो जो हाई परफॉर्मंस साठी प्रसिद्ध आहे. तर दुसरा हेक्सा कोर आहे ज्याचा क्लॉक स्पीड 1.6गीगाहट्र्जचा आहे आणि हा कोर्टेक्स-ए53 आर्किटेक्चर वर चालतो आहे. तसेच आर गॅलेक्सी एम10 बद्दल बोलायचे तर आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार या फोन मध्ये प तुम्हाला 3जीबी रॅम मिळेल. पण हा फोन एक्सनोस 7870 चिपसेट वर आधारित असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here