सॅमसंग येत्या 20 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मधून कंपनीचा गॅलेक्सी एस10 टेक मंचावर येईल. चर्चा अशी आहे कि यादिवशी सॅमसंग गॅलेक्सी एस10 सोबत गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी एस10 प्लस अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च करेल. तसेच सॅमसंग या ईवेंट मध्ये आपला पहिला 5जी स्मार्टफोन पण दाखवू शकते. सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज बद्दल आतापर्यंत अनेकप्रकारचे लीक्स आले आहेत. पण आज 91मोबाईल्स सॅमसंगच्या अधिकृत घोषणेच्या आधी गॅलेक्सी एस10 प्लस ची ईमेंज घेऊन आला आहे.
91मोबाईल्सला सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस चा खरा फोटो मिळाला आहे. या फोटोज मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दखवण्यात आले आहेत. या फोटोज मधून एकीकडे गॅलेक्सी एस10 प्लस च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे तर दुसरीकडे या फोनच्या काही फीचर्सचा खुलासा पण फोन लॉन्चच्या आधी झाला आहे. गॅलेक्सी एस10 प्लसची सर्वात मोठी खासियत फोन मधील दोन पंच होल असतील. तसेच हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
गॅलेक्सी एस10 प्लस च्या फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या उजवीकडे दोन छोटे छिद्र देण्यात आले हायेत. या दोन्ही छिद्रांमध्ये दोन कॅमेरा सेंसर आहेत. आतपर्यंत सिंगल पंच होल डिस्प्ले वाले फोनच बाजारात आले आहेत पण गॅलेक्सी एस10 प्लस नवा रिकॉर्ड बनावट डुअल पंच होल डिस्प्ले असलेला फोन आणत आहे. फोन मध्ये फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो दोन्ही बाजूने कर्व्ड आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आले आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम बटण आणि बिक्सबे बटण आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लसच्या बॅक पॅनल वर हॉरिजॉन्टल शेप मध्ये क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईट सह येतो. या चार कॅमेरा सेंसर्स मध्ये प्राइमरी शूटर सह एक टेलीफोटो लेंस, एक वाईड एंगल लेंस आणि एक स्टैंडर्ड लेंस असेल. गॅलेक्सी एस10 प्लसच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. बॅक पॅनल वर मधोमध सॅमसंग लोगो आहे तसेच खालच्या बाजूला गॅलेक्सी एस10 प्लस लिहिण्यात आले आहे.
स्पेसिफिकेशन्स पाहता गॅलेक्सी एस10 प्लस क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च केला जाऊ शकतो. तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9820 चिपसेट असेल. काही दिवसांपूर्वी गीकबेंच वर गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6जीबी रॅम असल्याचे समोर आले होते. गॅलेक्सी एस10 प्लसच्या फोटो नंतर लवकरच या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण आम्ही घेऊन येऊ.















