सोनी घेऊन येत आहे 21:9 डिस्प्ले असलेला नवीन फोन एक्सपीरिया 4, स्पेसिफिकेशन्स आले समोर

टेक कंपनी सोनी ने गेल्या महिन्यात झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये एक साथ 4 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनीने एक्सपीरिया एल3, एक्सपीरिया 1, एक्सपीरिया 10 आणि एक्सपीरिया 10 प्लस अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आणले होते. हि पहिली वेळ होती जेव्हा एखाद्या टेक कपंनी ने 21:9 आस्पेक्ट रेशियो वर फोन सादर केला होता. हे चारही स्मार्टफोन आता भारतात येणे बाकी आहे, पण सोनी अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या अजून एका फोन सह तयार झाली आहे. एका ताज्या लीक मध्ये समोर आले आहे कि सोनी या आस्पेक्ट रेशियो सह अजून एक स्मार्टफोन बाबत आहे जो एक्सपीरिया 4 नावासह टेक बाजारात येईल.

सोनी एक्सपीरिया 4
सोनी एक्सपीरिया 4 संबंधित हि बातमी Sumahoinfo ने आपल्या रिपोर्ट मध्ये शेयर केली आहे. या रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि सोनी आपल्या अजून एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो एक्सपीरिया 4 नावासह लवकरच अंर्तराष्ट्रीय मोबाईल बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये या फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. समोर आलेल्या ताज्या लीक्स नंतर बोलले जात आहे कि एक्सपीरिया 4 एमडब्ल्यूसी 2019 मध्ये लॉन्च झालेल्या एक्सपीरिया 1 चा छोटा म्हणजे कॉम्पेक्ट वर्जन म्हणून बाजारात येऊ शकतो जो किंमतीच्या बाबतीत पण एक्सपीरिया 1 पेक्षा स्वस्त असेल.

लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास

सोनी एक्सपीरिया 4 ची डिजाईन
ताजा रिपोर्टनुसार एक्सपीरिया 4 पण सोनी द्वारा 21:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले वर सादर केला जाईल. म्हणजे या फोनचा डिस्प्ले अरुंद आणि लांब असेल. या फोनला कोणतीही नॉच दिली जाणार नाही. डिस्प्लेवर तसेच खाली बारीक बॉडी पार्ट असले तर स्क्रीनच्या दोन्ही साईड पूर्णपणे बेजल लेस असतील. लीकनुसार कंपनी हा फोन 5.7-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर सादर करू शकते जो 1080 x 2520 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल.

सोनी एक्सपीरिया 4 चे स्पेसिफिकेशन्स
लीकनुसार सोनी एक्सपीरिया 4 4जीबी रॅम सह सादर केला जाईल जो 64जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करेल. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर सादर केला जाऊ शकतो सोबत हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल. लीकनुसार एक्सपीरिया 4 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीकनुसार पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,800एमएएच ची बॅटरी असू शकते. माहितीनुसार फोनचा आस्पेक्ट रेशियो कमी असल्यामुळे सोनी या फोन मध्ये 9.4एमएम चपटी बॅटरी देईल जी फोन बॉडीच्या आत सहज फिट होईल. हा फोन 3.5एमएम आडियो जॅकला पण सपोर्ट करेल करेगा तसेच कंपनी सिल्वर, ब्लॅक, पर्पल आणि रेड कलर वेरिएंट मध्ये हा फोन लॉन्च करू शकते.

एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत आहे ट्रिपल कॅमेरा असलेला वीवो वाय5 आणि वाय3 मॉडेल

सोनी एक्सपीरिया 1
एक्सपीरिया 4 सोनी च्या एक्सपीरिया 1 चा छोटा वर्जन म्हणून लॉन्च होऊ शकतो. एक्सपीरिया 4 पाहता हा जगातील पहिला फोन आहे ज्यात 21:9 आस्पेक्ट रेशियो डिस्प्ले सोबत आय ऑटो फोकस ट्रॅकिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन आईपी रेटेड आहे. फोनच्या साइड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. सोनी एक्सपीरिया 1 £799 मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसी अनुसार जवळपास 74,000 रुपये होतात. त्यामुळे आशा आहे कि एक्सपीरिया 4 मीड रेंज मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

सोनी एक्सपीरिया 1 चे स्पेसिफिकेशन्स
या फोन मध्ये 6.5-इंचाचा 4के एचडीआर ओएलईडी डिस्प्ले मिळेल जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आहे. हा डॉल्बी ऐटमॉस ऑडियो टेक्नॉलजीला सपॉर्ट करतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 12-एमपी + 12एमपी + 12एमपी चा कॉम्बिनेशन मिळेल. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

सोनी एक्सपीरिया 1 कंपनी द्वारा 6जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. जर तुम्हाला फोनची स्टोरेज वाढवायची असेल तर माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. सोनी एक्सपीरिया 1 मध्ये एंडरॉयडचा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,330एमएएच ची बॅटरी देण्यात आला आहे.

वाया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here