Find My Device म्हणजे काय? कसं वापरायचं आणि याचे फायदे काय? जाणून घ्या महत्व

Highlights

  • फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास Find My Device उपयोगी ठरेल.
  • हे एक Google App आहे जे फोनमध्ये इन्स्टाल करता येतं.
  • फाइंड माय डिवाइस फोन शोधण्यासाठी किंवा डेटा सिक्योर करण्यास मदत करतो.

तुमच्या मोबाइल फोनमध्ये तुमची बरीच महत्वाची माहिती आहे, असं म्हणणं कदाचित चुकीचं ठरणार नाही. पर्सनल फाईल्स, फोटोज, डेटा आणि मेसेजपासून बॅकिंग व फायनांस डिटेल्स सर्व फोनमध्ये असतात. त्यामुळे जर स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर जास्त टेंशन येतं. त्यामुळे अशा कठीण परिस्थिती ‘Find My Device’ सर्वात जास्त उपयोगी पडतो. ही ती सर्व्हिस आहे जी सर्व अँड्रॉइड फोनमध्ये मिळते. पुढे या ‘फाइंड माय डिवाइस’ चे फीचर्स आणि फायदे सांगण्यात आले आहेत.

Find My Device म्हणजे काय

फाइंड माय डिवाइस एक Google App आहे ज्याची निर्मिती फोन व स्मार्ट डिवाइसेजसाठी करण्यात आली आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर आहे जे डिवायसेज रिमोटली अ‍ॅक्सेस करण्यास मदत करतं. हे अ‍ॅप खासकरून फोन हरवल्यावर किंवा चोरी झाल्यावर त्याचं लोकेशन जाणून घेण्यासाठी, फोन पूर्णपणे लॉक करण्यासाठी किंवा त्यातील डेटा डिलीट करण्याचं काम करतं.

Find My Device च्या माध्यमातून तुमचा चोरी झालेला किंवा हरवलेल्या फोनवर SOS मेसेज पाठवता येतो आणि फोन डिस्प्लेवर कस्टमाइज्ड नोटिफिकेशन मेसेज देखील पाठवता येतो जो तुमच्या परवानगीविना कोणीच हटवू शकत नाही. हे गुगल अ‍ॅप Android OS आधारित मोबाइल फोन्ससह टॅबलेट आणि स्मार्टवॉचवर देखील डाउनलोड व इन्स्टाल करता येतं.

कसं वापरायचं फाइंड माय डिवाइस

Find My Device चा फायदा घेण्यासाठी हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करून तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टाल करा. अ‍ॅप इन्स्टाल झाल्यानंतर तुमच्या जीमेल अकाऊंटवरून या अ‍ॅपमध्ये लॉगइन करा. अकाऊंट लॉगइन करताच अ‍ॅप्लीकेशन लोकेशन, इंटरनेट, कॉल लॉग इत्यादीचा अ‍ॅक्सेस देण्यास विसरू नका.

जर तुमचा मोबाइल फोन हरवला असेल किंवा चोरी झाला असेल तर फाइंड माय डिवाइस अ‍ॅप तुम्हाला दुसऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये इन्स्टाल करावं लागेल. अ‍ॅपमध्ये त्याच जीमेल अकाऊंटवरून लॉगइन करावं लागेल, जे अकाऊंट हरवलेल्या फोनमध्ये होतं. लॉगइन करताच तुम्चाला हरवलेल्या फोनची माहिती दिसेल. इथे फोनचं नाव, त्याचं लास्ट लोकेशन, बॅटरी परसेंट आणि कनेक्टेड नेटकर्व दिसेल.

Find My Device चे फायदे

  • 1. Play Sound
  • 2. Secure Device
  • 3. Erase Device

प्ले साउंड

– फाइंड माय डिवाइस तीन गोष्टींमुळे युजर्ससाठी फायदेशीर ठरतो. पहिला पर्याय तेव्हा उपयुक्त ठरतो जेव्हा तुम्ही फोन घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवून विसरता आणि फोन सायलंट मोडवर असतो. अशावेळी फोन शोधून सापडला नाही तर ‘प्ले साउंड’ चा वापर करता येतो.

अ‍ॅपमध्ये प्ले साउंड ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा फोन वाजू लागतो. ही एक लाउड नोटिफिकेशन म्यूजिक असेल जी सतत वाजत राहील. फोन जर सायलंट किंवा व्हायब्रेशन मोडवर असेल तरीही देखील हा साऊंड येईल, ज्यामुळे फोन शोधण्यास मदत होईल.

सिक्योर डिवाइस

– फाइंड माय डिवाइसमधील या दुसऱ्या ऑप्शनमुळे इतर कोणीही तुमच्या फोनमधील कोणतंही फीचर अ‍ॅक्सेस करू शकत नाहीत. इतकंच नव्हे तर या ऑप्शनमुळे तुम्ही तुमच्या हरवलेल्या फोनच्या डिस्प्लेवर असा मेसेज पाठवू शतक जो कायम स्क्रीनच्यावर वॉलपेपर प्रमाणे दिसेल आणि हटवता येणार नाही.

मेसेज सोबतच तुम्ही तुमचा फोन नंबर देखील त्या मोबाइल डिस्प्लेवर लावू शकता. विशेष म्हणजे चोरी झालेल्या फोनच्या स्क्रीनवर फक्त तुमचा नंबर नव्हे तर एक कॉलिंग बटन देखील दिसेल, जो दाबताच तुम्ही मेसेज केलेल्या नंबरवर कॉल येईल. Find My Device च्या या ऑप्शनमध्ये मेसेज सेंड होताच फोन लॉक देखील होईल आणि त्यातील कोणतंही फीचर वापरता येणार नाही.

इरेज डिवाइस

– हा ऑप्शन तुमच्या चोरीला गेलेल्या फोनमधील संपूर्ण डेटा हटवतो म्हणजे पूर्णपणे फार्मेट करतो. हा पर्याय फोन पुन्हा मिळण्याची शक्यता नसल्यास वापरला पाहिजे. कारण एकदा Erase Device केल्यावर संपूर्ण फोन डेटा साफ होईल ज्यात ईमेल आयडी व फाइंड माय डिवाइसचा डेटा देखील असेल.

अ‍ॅप डेटा डिलीट झाल्यावर तुम्ही तुमचा फोन ट्रॅक देखील करू शकणार नाही. Find My Device चा हा ऑप्शन तुमच्या डेटाचा गैरवापर होऊ नये यासाठी आहे आणि तुमच्या फोनमधील सर्व माहिती, फोटो, व्हिडीओ, कॉन्टेक्ट लिस्ट, मेसेज आणि बँक डिटेल्स इत्यादी फोनवरून हटवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here