लकी नंबर, जन्मतारीख असलेला मोबाइल नंबर मिळवा फ्री; घरपोच Free VIP Mobile Number असलेलं सिम

अनेकांना आपल्या कार आणि मोबाइलसाठी खास नंबर हवा असतो. काही लोक लकी नंबरच्या मागे लागतात किंवा काहींना जन्मतारीख किंवा अ‍ॅनिव्हर्सरी सारख्या खास तारखा अशा नंबर्समध्ये हव्या असतात. अशा नंबर्सना VIP Number म्हणतात. असे विआयपी मोबाइल नंबर्स हजारो रुपयांमध्ये विकेल जातात आणि लोक ते खरेदी देखील करतात. परंतु सध्या VIP Number Free मध्ये मिळवण्याची संधी मिळत आहे. ही शानदार ऑफर Vi (vodafone idea) नं सादर केली आहे, ज्यात तुमच्या आवडीचा विआयपी नंबर तुम्ही मोफत निवडू शकता.

वोडाफोन आयडियानं आपल्या ग्राहकांसाठी अगदी मोफत विआयपी नंबर मिळवण्याची संधी आणली आहे. ही कंपनी युजर्सना मोफत स्पेशल मोबाइल नंबर देत आहे ज्यासाठी कोणतेही पैसे नाही. महत्वाची बाब म्हणजे VIP Mobile Number तुम्ही तुमच्या घर बसल्या ऑर्डर करू शकता तसेच याची होम डिलिव्हरी देखील Vi कडून मोफत केली जाईल. पुढे सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही देखील तुमच्या आवडीचा विआयपी नंबर मिळवू शकता. हे देखील वाचा: पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप

Free VIP Number कसा मिळवायचा?

1. सर्वप्रथम वोडाफोन आयडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा. डायरेक्ट लिंकसाठी (इथे क्लिक करा)

2. वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही थेट Free VIP Number सेक्शनमध्ये पोहोचाल. इथे तुम्हाला तीन पॉईंट्समध्ये डिटेल्स भरावे लागतील.

3. सर्वप्रथम तुमचा एरिया पिनकोड नोंदवा, ज्यामुळे कंपनी तुमच्या क्षेत्रात सिम डिलिव्हरी करू शकेल की नाही हे समजेल.

4. एरिया पिनकोड नंतर तुमचा वर्तमान मोबाइल फोन नंबर सबमिट करा.

5. दूसरे पॉईंटमध्ये तुम्हाला ‘I want number of my choice’ हा पर्याय निवडावा लागेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचा मोबाइल नंबर निवडता येईल.

6. हा ऑप्शन सिलेक्ट करताच तुमच्या समोर नंबर्सची संपूर्ण यादी येईल ज्यात तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही नंबर निवडू शकता.

7. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे 3 किंवा त्यापेक्षा जास्त डिजिट टाकून संबंधित नंबर देखील सर्च करू शकता.

8. कंपनीकसून Free सोबतच Premium चा ऑप्शन देखील दिला जाईल, ज्यात काही असे मोबाइल नंबर असतील ज्यासाठी एक्स्ट्रा पैसे देखील देता येतील.

9. तुमच्या आवडीचा विआयपी नंबर निवडल्यानंतर तुमच्या घराचा पत्ता टाका जिथे सिम डिलिव्हर करायचं आहे.

10. मोबाइल नंबर/ओटीपी सोबतच ही प्रोसेस पूर्ण होईल तसेच निवडलेला VIP Number असलेला Mobile SIM तुमच्या घरी पोहोचेल.

Published by
Siddhesh Jadhav