60एमपीच्या सेल्फी कॅमेर्याह Infinix Zero 20 चीनमध्ये लाँच

108 Megapixel Rear And 60mp Selfie Camera Phone Infinix Zero 20 Launched Know Price And Specifications Details

Infinix नं काही दिवसांपूर्वी भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Note 12 Pro लाँच केला आहे. कंपनीच्या नोट सीरिजमधील हा पाचवा फोन आहे जो 8GB RAM, Helio G99 SoC, 108MP Camera सारख्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतीय बाजारात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं या हँडसेटची किंमत 17 हजारांच्या बजेटमध्ये ठेवली आहे. तर तिकडे जागतिक बाजारात इनफिनिक्सनं आपल्या ‘झिरो’ सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन सादर केला आहे. चीनमध्ये Infinix Zero 20 स्मार्टफोन लाँच झाला आहे जो 60MP Selfie Camera, 108MP Rear Camera, 8GB RAM, MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि 4,500mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

Infinix Zero 20 Camera

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोबाइलच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन Infinix Zero 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. इनफिनिक्सनं हा World’s Best Vlog Camera असल्याचं म्हटलं आहे. हे देखील वाचा: OPPO भारतात सादर करणार तीन स्वस्त फोन A17, A17K आणि A77S; इतक्या कमी किंमतीत होणार एंट्री

108 Megapixel Rear And 60mp Selfie Camera Phone Infinix Zero 20 Launched Know Price And Specifications Details

Infinix Zero 20 Specifications

इनफिनिक्स झिरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G Phone मध्ये देखील मिळणार 5000mAh ची बॅटरी; Jio Phone 5G च्या फीचर्सचा खुलासा

Infinix Zero 20 अँड्रॉइड आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्टफोन 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

108 Megapixel Rear And 60mp Selfie Camera Phone Infinix Zero 20 Launched Know Price And Specifications Details

Infinix Zero 20 Price

जागतिक बाजारात Infinix Zero 20 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. या एकमेव मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. Infinix Zero 20 ची किंमत 460 युरो ठेवण्यात आली आहे. भारतीय करंसीनुसार Infinix Zero 20 Price 21,000 रुपयांच्या आसपास आहे तसेच हा फोन Gold आणि Gray कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनच्या भारतीय लाँच कोणतीही माहिती दिली नाही परंतु कंपनीचा इतिहास पाहता हा हँडसेट लवकरच भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here