Google Pixel 4 आणि Pixel 4XL झाले लॉन्च, शानदार कॅमेरा आणि प्रोसेसरच्या जीवावर करेल का मार्केटवर राज्य

Google ने अखेरीस आपली Pixel 4 सीरीज अधिकृतपणे लॉन्च केली आहे. गूगल पिक्सल 4 सीरीज काल न्यूयॉर्क मध्ये आयोजित Made by Google इवेंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने गूगल पिक्सल 4 आणि गूगल पिक्सल 4 एक्सएल अनेक शानदार फीचर्स आणि दमदार कॅमेऱ्यासह सादर केले आहेत. फोन्स मध्ये यावेळी मागे चौकोनी आकाराचा डुअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता

Google Pixel 4 ची बेस किंमत $799 (जवळपास 57,100 रुपये) आहे आणि गूगल पिक्सल 4 एक्सएल 899 डॉलर (जवळपास 64,000 रुपये) मध्ये विकला जाईल. तसेच डिवाइस कालच प्री-ऑर्डर साठी आले आहेत आणि 24 ऑक्टोबरपासून हे शिप केले जातील.

भारतात होणार नाहीत लॉन्च

सर्वात महत्वाची बातमी अशी कि पिक्सल 4 सीरीज भारतात लॉन्च केली जाणार नाही. याची माहिती स्वतः कंपनीने दिली आहे. गूगलने आपल्या विधानात अधिकृतपणे सांगितले आहे कि Pixel 4 भारतात येणार नाही. याचे कारण फोनच्या फ्रंटला असेलेली Soli Radar Chip आहे. जिच्या मदतीने मोशन सेंस (motion sense) आणि फेस अनलॉक (face unlock) फीचर चालतात.

दोन्ही फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन्स 6जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज व 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज मॉडल मध्ये सादर केले गेले आहेत. पण स्टोरेज वाढवण्याचा पर्याय फोन मध्ये नाही. फोन्स मध्ये गूगल क्लाउड स्टोरेज मिळेल.

मोशन सेंस

कंपनीने पिक्सल 4 सीरीज मध्ये मोशन सेंस फीचर दिला आहे जो सर्वात आधी सोनी एरिक्सन फोन्स मध्ये दिसला होता. गूगलच्या नव्या टेक्नॉलजीच्या मदतीने यूजर्स आपला फोन स्पर्श न करता वापरू शकतील. या फीचरच्या मदतीने यूजर्स गाणी बदलणे, अलार्म बंद करणे आणि फोन कॉल साइलेंट करणे अशी कामे फक्त हातच्या इशाऱ्याने करू शकतील.

Pixel 4XL आणि Pixel 4 चे स्पेसिफिकेशन्स

पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल चे स्पेसिफिकेशन पाहता दोन्ही हँडसेट मध्ये इंप्रूव्ड गूगल असिस्टेंट, गूगल कॅमेरा 7.1 ऍप, क्विक जेस्चर आणि मोशन सेंस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच Pixel 4 मध्ये 5.7 इंचाचा फुल-एचडी+ ओलेड स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच पिक्सल 4 एक्सएल मध्ये 6.3 इंचाचा क्वाड एचडी+ ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

तसेच फोन्स नवीन एंडरॉयड 10 वर आधारित आहेत. हा पहिला फोन नाही जो एंडरॉयड 10 सह लॉन्च झाला आहे. दोन्ही फोन मध्ये नॅनो सिम स्लॉट आहे. डुअल सिम कनेक्टिविटी साठी ई-सिम सपोर्ट आहे.

पावर बॅकअप साठी पिक्सल 4 मध्ये बॅटरी 2,800 एमएएच ची आहे आणि पिक्सल 4 एक्सएल मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18 वॉट फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यावेळी फोन्सची खासियत अशी कि यात डुअल रियर कॅमेरा आहे. पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल मध्ये दोन रियर कॅमेरा आहेत. पिक्सल 4 सीरीज मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर (एफ/ 2.4 अपर्चर) आणि 12.2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा (एफ/ 1.7 अपर्चर, 77 डिग्री फील्ड ऑफ व्यू) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here