या महाग एंडराॅयड फोन मध्ये येत आहे ‘टच प्रॉब्लम’, फोन विकत आहेत यूजर

Google ने ऑक्टोबर मध्ये भारतात Google Pixel 4a स्मार्टफोन लाॅन्च केला होता, जो 31,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला होता. ग्लोबल मार्केट मध्ये गूगलने या सीरीजचा अजून माॅडेल Google Pixel 4a 5G पण आणला होता, जो इंडियन मार्केट मध्ये 5जी नेटवर्कची उपलब्धता नसल्यामुळे लाॅन्च होऊ शकला नाही. आता या फोन संबंधित बातम्या समोर येत आहेत की पिक्सल यूजर्सना फोन मध्ये टचची समस्या येत आहे त्यामुळे फोन वापरणे कठीण झाले आहे.

Google Pixel 4a 5G संबंधित ही बातमी गिजमोचायनाने प्रकाशित केली आहे. रिपोर्टनुसार वेगवेगळ्या देशांमधील काही पिक्सल स्मार्टफोन यूजर्स तक्रार करत आहेत की त्यांच्या फोन मध्ये वारंवार टचची समस्या येत आहे. स्क्रीन वर जी टॅप केली जात आहे ती रजिस्टर होत नाही. डिस्प्लेच्या कडेवर केलेला टच काम करत नाही आणि 3-बटन नेविगेशन फीचर वापरण्यात अडचण येत आहे. तसेच यूजरनुसार पिक्सल मध्ये सिक्योरिटी पॅच अपडेट केल्यानंतर ही समस्या सुरू झाली आहे.

Google Pixel 4a

गूगल पिक्सल 4ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.81 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वर डावीकडे पंच-होल आहे. Google Pixel 4a मध्ये आलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर आणि 443पीपीआई ला सपोर्ट करतो. Google Pixel 4a एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 6 जीबी जीबी रॅम सह बाजारात आणला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्स सह येतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे ज्या सोबत फोन मध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

गूगल पिक्सल 4ए वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here