कमालीच्या फीचर्ससह लवकरच भारतात लॉन्च होईल Google Pixel 5a, इंडियन साइटवर झाला लिस्ट

Google Pixel सीरीजच्या नवीन डिवाइसच्या लॉन्च बद्दल बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अलीकडेच टिप्स्टर Jon Prosser ने ट्वीट करून माहिती दिली होती की अपकमिंग गूगल पिक्सल डिवाइस यावर्षी जून मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण कंपनीने अजूनही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तसेच आता पिक्सल सीरीजच्या नवीन फोन Google pixel 5a च्या इंडिया लॉन्चबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. फोन इंडियन साइट BIS वर स्पॉट झाला आहे, त्यामुळे शक्यता व्यक्त केली जात आहे की फोन लवकरच इंडियन मार्केटमध्ये सादर केला जाऊ शकतो. या फोनचे कोडनेम GROM2 असेल.

Google Pixel 5a भारतात होईल लवकरच लॉन्च
Google Pixel 5a गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Pixel 4a चा अपग्रेडेड वर्जन असेल. नवीन रिपोर्टनुसार फोन लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. पॉप्यूलर टिपस्टर मुकुल शर्माने ट्विटरवर भारतीय बीआईएस वेबसाइटवर लिस्ट पिक्सेल डिवाइसचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोनचा मॉडेल नंबर GROM2 आणि स्क्रीनशॉटवरून समजले आहे की हा एक Google डिवाइस असेल. फोन पुढल्या महिन्यात भारतात खरेदीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Google Pixel 5a चा रेंडर
गेल्या महिन्यात Pixel 5a चे काही अधिकृत दिसणारे रेंडर ऑनलाइन लीक झाले होते. रेंडरर्सवरून समजले कि फोनमध्ये Pixel 4a सारखी डिजाइन असेल पण यात डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच Pixel 5a मध्ये कथित 6.2 इंचाचा फ्लॅट OLED डिस्प्ले असेल आणि यात बॅक पॅनल प्लास्टिकचा असेल.

फ्रंटला सेल्फी कॅमेर्‍यासाठी कटआउट आणि मागे डुअल कॅमेरा सेटअप आहे. प्रोसेसरबाबत सध्या कोणतेही लीक्स समोर आले नाहीत पण असे बोलले जात आहे की या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 700 सीरीज चिपसेट दिला जाऊ शकतो.

फोल्डेबल Google Pixel फोन
याआधी टिप्स्टरने पण खुलासा केला होता कि Google एका अश्या पिक्सल स्मार्टफोनवर काम करत आहे जो फोल्डेबल डिस्प्लेसह येऊ शकतो. The Elec च्या रिपोर्टनुसार, गूगल आणि इतर कंपन्यांनी Samsung ला फोल्डेबल पॅनल बनवण्याची विनंती केली आहे. रिपोर्टवरून समजले आहे की फोल्डेबल OLED स्क्रीनची साइज 7.6 इंच असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here