Google Pixel 6a मध्ये मोठा घोटाळा समोर; फिंगरप्रिंट रजिस्टर न करताच फोन होतोय अनलॉक

Photo : Geekyranjit

Google Pixel 6a स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लाँच करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षानंतर गुगलचा पिक्सल स्मार्टफोन भारतात आल्यामुळे चाहत्यांनी या हँडसेटला डोक्यावर घेतलं आहे. परंतु आता चाहत्यांच्या आनंदावर विरजण घालणारी बातमी आली आहे. गुगलच्या लेटेस्ट Pixel 6a स्मार्टफोनमध्ये मोठी गडबड समोर आली आहे. यामुळे युजर्सची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. हा फोन रजिस्टर न करताच कोणाच्याही फिंगरप्रिंटनं अनलॉक होत आहे. पिक्सल फोनमधील या त्रुटीची सर्वप्रथम इंडियन युट्युबर Geekyranjit आणि Beebom यांनी दिली आहे. त्यांनी याचे व्हिडीओ देखील शेयर केले आहेत. 91मोबाईल्सच्या रिव्यू यूनिटमध्ये देखील अशाप्रकारची गडबड दिसली आहे. गुगल पिक्सल 6a स्मार्टफोनची विक्री 28 जुलैपासून फ्लिपकार्टवर केली जाणार आहे. विशेष म्हणजे गुगलनं या फोन मध्ये सिक्योरिटीसाठी खास Titan M2 चिपसेटचा वापर केला आहे.

91mobiles ला मिळालेल्या रिव्यू यूनिट देखील रजिस्टर न केलेल्या फिंगरप्रिंटनं देखील गुगल पिक्सल 6ए स्मार्टफोन अनलॉक होत आहे. पुढे दिलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही हे पाहू शकता.

https://www.facebook.com/watch/?v=1074923253401278

Google Pixel 6a युजर्सची सुरक्षा धोक्यात

Google Pixel 6a मध्ये येणारी ही समस्या खराब हार्डवेयरमुळे आहे की सॉफ्टवेयरमुळे याची माहिती कंपनीनं दिलेली नाही. कंपनीकडून या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती आली नाही. कोणत्याही फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या स्मार्टफोनमध्ये आधी फिंगरप्रिंट रजिस्टर करावं लागतं मगच त्या फिंगरप्रिंटनं फोन अनलॉक होतो. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्मार्टफोनचा पासवर्ड आवश्यक असतो. परंतु गुगलचा हा फोन रजिस्टर न केलेल्या फिंगरप्रिंटनं देखील ओपन होत आहे. त्यामुळे कोणीही हा स्मार्टफोन अ‍ॅक्सेस करू शकतो. टेक युट्युबर गीकीरंजीत आणि बीबॉम यांनी एक व्हिडीओ शेयर करून हा दोष सर्वप्रथम रिपोर्ट केला आहे. या त्रुटीमुळे गुगलचा हा फोन युजर्सची सुरक्षा धोक्यात टाकत आहे.

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12.2MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेरा सेटअप OIS आणि EIS ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K 60FPS व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते.

हा फोन Android 12 OS सह सादर करण्यात आला आहे. गुगलचा हा फोन कंपनीच्या Tensor प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G78 GPU देण्यात आला आहे. यात 6GB LPDDR5 RAM, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4306mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

गुगलच्या या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज इंप्रीसनसह सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 LE, GPS, NFC आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. यात Titan M2 सिक्योरिटी चिप देखील देण्यात आली आहे.

28 तारखेला विक्री सुरु

Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची भारतात किंमत 43,999 रुपये आहे, जो चारकोल (ब्लॅक) आणि चाक (व्हाईट) कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. या फोनचा सेज (ग्रीन) कलर ऑप्शन भारतात लाँच करण्यात आला नाही. फोनची भारतात विक्री 28 जुलैपासून केली जाईल. सध्या प्री-बुकिंग फ्लिपकार्टवर सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here