Google Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Google ने आपल्या Pixel 9 सीरीजचे चार फोन्स भारतासह जागतिक स्तरावर लाँच केले आहेत. यामध्ये Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold यांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये आकर्षक डिझाईन आणि AI तंत्रज्ञानावर आधारित फिचर्स पाहायला मिळतील. इतकेच नाही तर उत्तम कॅमेरा अनुभव, परफॉर्मन्स, दीर्घ बॅटरी आणि स्मूथ अँड्रॉईड अनुभव यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. चला, पुढे या पोस्टमध्ये Pixel 9, Pro आणि XL ची स्पेसिफिकेशन आणि किंमतीचे तपशील जाणून घ्या.

Google Pixel 9 चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Google Pixel 9 मध्ये 6.3 इंचाचा Actua OLED डिस्प्ले दिला गेला आहे. यात 20:9 आस्पेक्ट रेशो, 1080 x 2424 चे पिक्सेल रिझोल्यूशन, 422 PPI स्मूथ (60-120Hz) रिफ्रेश रेट आहे. स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण मिळत आहे. इतकंच नाही तर या फोनमध्ये 1800 निट्स पर्यंत (HDR) आणि 2700 निट्स पर्यंतचा पीक ब्राईटनेस, 2,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशो चा सपोर्ट मिळत आहे.
  • चिपसेट: मोबाइलमध्ये ब्रँडने परफॉर्मन्ससाठी नवीन Google Tensor G4 चिपसेट ऑफर केला आहे. सुरक्षेसाठी यात Titan M2 चिपही बसविण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्हाला एक चांगला अनुभव मिळेल.
  • स्टोरेज आणि रॅम: Google Pixel 9 साठी युजर्संना 12GB रॅम सोबत 128GB आणि 256GB असे दोन मॉडेल मिळतील.
  • कॅमेरा: Google Pixel 9 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सिस्टम मिळत आहे. त्याच्या बॅक पॅनलमध्ये 50 मेगापिक्सेलची वाईड प्रायमरी लेन्स आणि मॅक्रो फोकससह 48 मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड लेन्स दिली गेली आहे. यात सुपर रेझ्युम झूमने सुसज्ज 8x पर्यंत ऑप्टिकल गुणवत्ता आहे. त्याचवेळी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 10.5 मेगापिक्सेलचा ड्युअल PD सेल्फी कॅमेरा ऑटोफोकस ƒ/2.2 अपर्चर 95° अल्ट्रा वाईड फील्ड ऑफ व्ह्यूसह दिला गेला आहे.
  • बॅटरी: डिव्हाईसमध्ये 4700mAh ची बॅटरी आहे. यामुळे 24+ तासांची बॅटरी लाईफ, बॅटरी सेव्हरसह 100 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळू शकते. तर ती चार्ज करण्यासाठी, 45W फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
  • इतर: Google Pixel 9 फोनमध्ये Google VPN, पाणी आणि धूळ प्रतिरोधक IP68 रेटिंग, ॲडमी, मॅक्रो फोकस, फेस अनब्लर, यांसारखी अनेक AI कॅमेरा फिचर्स, ड्युअल सिम 5G, वायफाय 6, ब्लूटूथ v5.3, फिंगरप्रिंट अनलॉक, फेस अनलॉक, सॅटेलाइट एसओएस, स्टिरिओ स्पीकर सारखे अनेक पर्याय मिळत आहेत.

Google Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Google Pixel 9 Pro मध्ये 6.3 इंचाचा Actua OLED डिस्प्ले दिला गेला आहे. Pixel 9 Pro XL मध्ये आणखी मोठा 6.8 इंचाचा Actua OLED डिस्प्ले आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 20:9 आस्पेक्ट रेशो, 1080 x 2424 चे पिक्सेल रिझोल्यूशन, 422 PPI स्मूथ (60-120Hz) रिफ्रेश रेट देण्यात आले आहे. स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण दिलेले आहे. यासोबतच 1800 निट्स पर्यंत (HDR) आणि 2700 निट्स पर्यंतचा पीक ब्राईटनेस, 2,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशो चा सपोर्ट मिळत आहे.
  • चिपसेट: Google Pixel 9 सीरीजच्या या दोन्ही फोन बेस मॉडेलसारखे Google Tensor G4 चिपसेट आणि सुरक्षेसाठी Titan M2 चिपने सुसज्ज आहे.
  • स्टोरेज: स्टोरेज आणि रॅम च्या बाबतीत Google Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL मध्ये युजर्संना 16GB रॅम सह 128GB, 256GB, 512GB आणि 1TB असे चार पर्याय मिळतात.
  • कॅमेरा: Google Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा वाईड प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड मॅक्रो फोकस लेन्स आणि 48 मेगापिक्सेलची 5x टेलीफोटो लेन्स बसवण्यात आली आहे. जे 30x पर्यंत सुपर रेझ्युलेशन झूम आणि 0.5x, 1x, 2x, 5x, 10x पर्यंतची ऑप्टिकल गुणवत्ता प्रदान करते.
  • फ्रंट कॅमेरा: दोन्ही मॉडेल्समध्ये ब्रँडने फ्लॅगशिप लेव्हलचा 42 मेगापिक्सेल ड्युअल PD सेल्फी कॅमेरा ऑटोफोकस ƒ/2.2 ऍपर्चर 103° अल्ट्रावाईड फील्ड ऑफ व्ह्यूसह दिला आहे.
  • बॅटरी: Google Pixel 9 Pro ला चालवण्यासाठी यात 4700mAh ची बॅटरी आहे. तर मोठे मॉडेल Google Pixel 9 Pro XL मध्ये 5060mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे. दोन्हीमध्ये 45 वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह चार्ज करण्याची सुविधा आहे.
  • इतर: दोन्ही मोबाईलची इतर फिचर्स वर नमूद केलेल्या बेस मॉडेलसारखीच आहेत.
    ऑपरेटिंग सिस्टम: Google Pixel 9 सीरीजचे बेस मॉडेल तसेच Pro आणि XL मॉडेल्स अँड्रॉईड 14 सह येतात. सर्व व्हेरिएंटमध्ये 7 वर्षांची ओएस सुरक्षा आणि पिक्सेल ड्रॉप अपडेट्स मिळतील.

Google Pixel 9 सीरीजमध्ये नवीन काय आहे?

Pixel 9 मालिकेची खास गोष्ट म्हणजे यावेळी ब्रँडने उत्कृष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केला आहे. मोठी गोष्ट ही आहे की, या सीरीजमध्ये XL मॉडेलला प्रथमच जोडण्यात आले आहे. जिथे आधी 10.5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळत होता. आता Pro आणि XL मॉडेल्समध्ये 42 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. Pixel 9 डिव्हाईसच्या सामान्य मॉडेलमध्ये 12GB ची रॅम आहे. तर, Pro आणि XL मॉडेल 16GB पर्यंतच्या रॅम सोबत येतात.ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास यात 7 वर्षांचे अँड्रॉईड अपडेट्स आणि इतर सिक्युरिटी अपडेट्स देण्यात येत आहेत. एवढेच नाही तर एक वर्षाचे Google One सबस्क्रिप्शन दिले जात आहे. एकूणच, हे फ्लॅगशिप मोबाईल्स आधीच्या लाईनअप पेक्षा प्रत्येक बाबतीत मजबूत आहेत.

Google Pixel 9 सीरीजची किंमत

  • Pixel 9 ची किंमत 79,999 रुपयांपासून सुरू होते. हे ऑब्सिडियन, पोर्सिलेन, विंटरग्रीन आणि पेनी या रंगांमध्ये मिळतील.
  • Pixel 9 Pro ची किंमत 1,09,999 रुपयांपासून सुरू होते आणि Pixel 9 Pro XL ची किंमत 1,24,999 रुपयांपासून सुरू होते. हे ऑब्सिडियन, पोर्सिलेन, हेझेल आणि रोझ क्वार्ट्ज सारख्या रंगांमध्ये उपलब्ध होईल.
  • तुम्हाला सांगतो की, भारतात Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL च्या प्री-ऑर्डर उद्यापासून फ्लिपकार्ट आणि रिटेल भागीदारांच्या माध्यमातून सुरू होतील. तर हे 22 ऑगस्टपासून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच, इतर डिव्हाईस या वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here