फक्त 197 रुपयांमध्ये रोज 2GB डेटा, फ्री कॉलिंग आणि 100 दिवसांची वैधता; Jio-Airtel देखील राहिले मागे

भारतातील टेलिकॉम बाजारात जोरदार स्पर्धा सुरु आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन्स सादर करत आहेत. परंतु स्वस्त प्रीपेड प्लॅन्स सादर करण्याच्या बाबतीत सरकारी कंपनीनं BSNL मात देणं थोडं कठीण दिसतंय. 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्रीपेड प्लॅन हवा असेल तर BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन शानदार बेनिफिट्स देत आहे. BSNL च्या या प्लॅनची तुलना Jio, Airtel आणि Vi शी केल्यास तुम्हाला समजेल की या बजेटमध्ये कोणती कंपनी ग्राहकांना जास्त फायदे देत आहे.

BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन

BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन 100 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. अर्थात हा तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आहे. दरम्यान प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा दिला जातो. डेली डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 80 Kbps पर्यंत कमी होतो. हा एक ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन आहे, त्यामुळे कोणत्याही नंबरवर तुम्ही अमर्याद गप्पा मारू शकता. तसेच दिल्ली आणि मुंबईमध्ये रोमिंग चार्जेस देखील आकारले जाणार नाहीत कारण रोमिंग फ्री आहे. या प्लॅनमध्ये रोज 100SMS मोफत मिळतात. तसेच प्लॅनसोबत Zing अ‍ॅपचं सब्सस्क्रिप्शन मोफत मिळतं. या प्लॅनमध्ये सर्व फ्री बेनिफिट्स फक्त सुरुवातीच्या 18 दिवसांसाठी आहेत.

Jio चा 199 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 199 रुपयांच्या प्लॅनची वैधता फक्त 23 दिवस आहे. या कालावधीत तुम्हाला रोज 1.5GB डेटा दिला जात आहे. डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64 Kbps केला जाईल. यात अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स देण्यात आले आहेत. तसेच रोज 100SMS मोफत मिळतात. इतर फायदे पाहता या प्लॅनमध्ये Jio अ‍ॅप्सचे फ्री सब्सस्क्रिप्शन मिळते. तसेच 3 महिन्यांचे Disney+ Hotstar Mobile चं सब्सक्रिप्शन देखील मोफत देण्यात येईल.

Airtel चा 179 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 179 रुपयांच्या प्लॅन सोबत 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या 28 दिवसांमध्ये डेली डेटा दिला जात नाही तर एकूण 2GB डेटा दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 300SMS मिळतात. एयरटेलचा हा प्लॅन अनलिमीटेड कॉलिंग बेनिफिट्ससह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही नेटवर्क कॉल करून अमर्याद बोलू शकता. तसेच या प्लॅनमुळे तुम्ही FASTag रिचार्ज वर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. तसेच कंपनी Hellotunes आणि Wynk Music मोफत देत आहे.

Vi चा 195 रुपयांचा प्लॅन

Vi च्या या 195 रुपयांच्या प्लॅन सोबत 31 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2GB डेटा दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 300SMS मिळतात. वोडाफोन आयडियाचा हा प्लॅन अनलिमीटेड कॉलिंग बेनिफिट्ससह सादर करण्यात आला आहे. तसेच या पॅकमध्ये Vi movies and TV चे मोफत सब्सस्क्रिप्शन दिलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here