गुगल लाँच करू शकतो नवीन फोल्ड स्मार्टफोन, Pixel 9 Pro Fold नावाने होऊ शकते एंट्री

गुगल आपल्या पिक्सल फोल्ड मोबाईल पोर्टफोलियाच्या नावामध्ये बदल करू शकतो. गेल्यावर्षी कंपनीने आपला पिक्सल फोल्ड स्मार्टफोन बाजारात आणला होता. अपेक्षा केली जात आहे की, यावर्षी पिक्सल फोल्ड 2 येईल, परंतु लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की नवीन डिव्हाईस Google Pixel 9 Pro Fold नावाने बाजारात येऊ शकतो. चला, पुढे नवीन रिपोर्ट सविस्तर जाणून घेऊया.

Google Pixel 9 Pro Fold माहिती (लीक)

  • अँड्रॉईड अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार गुगल ब्रँडने यावर्षी आपल्या नवीन स्मार्टफोनच्या नावामध्ये बदल करत योजना बनविली आहे.
  • रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की Google Pixel 9 चे कोडनेम “tokay” आहे, तर Pixel 9 Pro चे कोडनेम “caiman” सांगण्यात आले आहे.
  • तसेच Google Pixel 9 Pro XL चे कोडनेम “komodo” आहे आणि Google Pixel 9 Pro Fold चे कोडनेम “comet” ठेवण्यात आले आहे.
  • या कोडनेमची पुष्टी यावर्षी लाँच होणाऱ्या डिव्हाईससाठी बनविली गेलेल्या सॉफ्टवेअर सोबत करण्यात आली आहे.
  • मोठी गोष्ट ही आहे की कंपनीने पूर्व मध्ये कोडनेम “comet” ला “पिक्सेल फोल्ड 2”साठी ठेवले होते तर आता हा Pixel 9 Pro Fold साठी आहे, यामुळे फोनचे नाव बदलले जाणार असल्याची गोष्ट समोर आली आहे.
  • हे पण सांगण्यात आले आहे की नवीन नाव “पिक्सेल 9 प्रो फोल्ड”अजून कंफर्म नाही आणि यात बदल असू शकतो.

Google Pixel Fold 2 (पिक्सेल 9 प्रो फोल्ड) स्पेसिफिकेशन (संभाव्य)

डिस्प्ले: पूर्व मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार आगामी पिक्सेल फोल्ड फोनमध्ये 8.02 इंचाची फोल्डिंग स्क्रीन आणि 6.29 इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळू शकतो.

प्रोसेसर: फोनमध्ये परफॉरमेंससाठी ब्रँड Tensor G3 तसेच नवीन चिपसेट Tensor G4 लावली जाऊ शकते. या Pixel 9 सीरिजच्या फोनमध्ये मिळण्याची गोष्ट पण समोर आली आहे.

इतर: बोलले जात आहे की अगामी फोल्डसह Pixel 9 डिव्हाईसमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसह सेलुलर मॉडेम मिळू शकतो. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की हे मॉडेम अगामी Tensor G4 चिपसेटचा एक हिस्सा असेल आणि याला सॅमसंगद्वारे निर्मित केले जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here