Google या महिन्यात ऑगस्टमध्ये आपला मेड बाय Google 2024 इव्हेंट आयोजित करत आहे, जिथे पिक्सेल 9 सीरीज लाँच केली जाईल. लाईनअपमध्ये या चार डिव्हाईस समावेश असेल, जे Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL, आणि फोल्डेबल Pixel 9 Pro Fold या नावांनी लाँच जातील. त्याचवेळी सतत लीक, अफवा आणि अधिकृत टीझर्सवरून आपल्याला Google Pixel 9 सीरीजकडून काय अपेक्षा करावी याचा ढोबळ अंदाज बांधण्यात आला आहे. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला Google Pixel 9 सीरीज लाँच होण्यापूर्वी त्याची अंदाजे किंमत आणि स्पेसिफिकेशन विषयी संपूर्ण माहिती देऊ.
Google Pixel 9 सीरीज भारतातील लाँच तारीख
Google सहसा दरवर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या नवीन Pixel लाईन डिव्हाईसला सादर करण्यासाठी इव्हेंट आयोजित करते. तथापि, यावर्षी टेक दिग्गजाने आपल्या नवीन Pixel सीरीजसाठी ऑगस्टची निवड केली आहे.
Google या आठवड्यात 13 ऑगस्ट रोजी Pixel 9 सीरीज जागतिक स्तरावर लाँच करेल, परंतु भारतात ही लाईनअप 14 ऑगस्ट रोजी लाँच होईल. त्याचवेळी, विशेष गोष्ट म्हणजे Pixel 9 सीरीजचे चारही फोन भारतीय बाजारात लाँच होण्याची अपेक्षा आहे. तसेच, हा फोन भारतात खरेदीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल जो आधीच अधिकृत करण्यात आला आहे.
Google Pixel 9 सीरीजची भारतीय किंमत (अपेक्षित)
- अलीकडील लीकवरून लक्षात येते की Google Pixel 9 सीरीज मागील पिढीच्या मॉडेलपेक्षा अधिक महाग असेल.
- लीकनुसार, Pixel 9 Pro ची सुरुवातीची किंमत $999.99 (अंदाजे रु. 84,000) आणि Pixel 9 Pro XL (256GB) ची सुरुवातीची किंमत $1,199.99 (अंदाजे रु. 1,01,000) असेल.
- Pixel 9 ची किंमत $650 ते $700 (अंदाजे रु. 59,000) च्या दरम्यान असू शकते. याव्यतिरिक्त, आम्हाला एक्सक्लुझिव्ह वरून असे कळाले की Pixel 9 Pro Fold दोन व्हेरिएंटमध्ये येईल: 256GB व्हेरिएंटची किंमत
- $1,799 (अंदाजे रु. 1,51,000) आणि 512GB व्हेरिएंटची किंमत $1,919 (अंदाजे रु. 1,61,000) असेल.
Google Pixel 9 सीरीजचे स्पेसिफिकेशन, फिचर्स (अपेक्षित)
किंमतीव्यतिरिक्त, लीकमधून Pixel 9 सीरीजच्या स्पेसिफिकेशन आणि फिचर्सबद्दलची बरीच माहिती उघड झाली आहे. तसेच, Pixel 9 सीरीजमधील सर्व फोनमध्ये Pixel 8 लाईनअपप्रमाणेच सात वर्षांचे फीचर ड्रॉप्स मिळतील याची खात्री आहे. चला पुढे Pixel 9 सीरीजच्या स्पेसिफिकेशन बद्दल आम्हाला कळालेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला देतो.
Google Pixel 9
हार्डवेअर कॉन्फिगरेशनच्या बाबतीत पिक्सेल 9 बद्दल आपल्याला फारसे माहिती नाही. परंतु, आम्हाला माहित आहे की Pixel 9 मध्ये 6.3 इंचाचा ऑटुआ डिस्प्ले असू शकतो.
त्याचवेळी, डिव्हाईसमध्ये Tensor G4 चिप सोबत 12GB पर्यंतची रॅम असू शकते. याशिवाय, फोटोग्राफीसाठी यात 10.5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल आणि मागील बाजूस यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी शूटर आणि 48 मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड लेन्स पाहायला मिळू शकते.
Google Pixel 9 Pro
तुम्हाला Pixel 9 Pro मध्ये 6.34 इंचाची स्क्रीन मिळू शकते जी 1,280 x 2,856 रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 494ppi आणि 2,050 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करेल. डिव्हाईस मध्ये Tensor G4 चिपसेट असेल ज्याला Titan M2 सिक्युरिटी चिपसोबत जोडले गेले आहे. सोबतच यात 4,600mAh ची बॅटरी आणि 30W चा चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
फोनमध्ये किमान 8GB रॅम आणि 256GB UFS 4.0 स्टोरेज दिले जाऊ शकते. त्याचवेळी Google Pixel 9 Pro मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड लेन्स आणि 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा पाहता येईल. सेल्फीसाठी 50MP कॅमेरा असू शकतो.
Google Pixel 9 Pro XL
लीक्सनुसार Google Pixel 9 Pro XL मध्ये 1,344 x 2,992 रिझोल्यूशन असलेला 6.73 इंचाचा OLED पॅनेल, 120Hz रिफ्रेश रेट, 487ppi, 2,050 निट्स ब्राईटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण असेल. डिव्हाईसला पॉवर देण्यासाठी टायटन M2 सिक्युरिटी चिप सोबत Tensor G4 SoC असेल.
हँडसेटमध्ये 30W चार्जिंग सपोर्टसह 5,050mAh ची बॅटरी असेल. हे किमान 8GB रॅम आणि 256GB UFS 4.0 स्टोरेजसह येईल. फोटोग्राफीसाठी डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड आणि 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर असेल.
Google Pixel 9 Pro Fold
आत्तापर्यंतच्या लीक आणि बातम्यांवर विश्वास ठेवल्यास Google चा फोल्डेबल फोन पहिल्यांदाच भारतात येईल. लीक्सनुसार Google Pixel 9 Pro Fold मध्ये 8 इंचाचा सुपर ॲक्टुआ मुख्य डिस्प्ले आणि 6.3 इंचाची ॲक्टुआ कव्हर स्क्रीन असेल. ते Tensor G4 चिप मधून पॉवर घेईल ज्यात Titan M2 सिक्युरिटी चिप आणि 16GB पर्यंत रॅम असेल.
डिव्हाईसमध्ये समोर 10 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 10.5 मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड लेन्स आणि 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा असेल. याव्यतिरिक्त, Google Pixel 9 Pro Fold मध्ये बिल्ट-इन VPN असेल आणि त्यात अनेक एआय टूल्स असतील. ज्यामध्ये सर्कल टू सर्च, मॅजिक एडिटर आणि बेस्ट टेक यांसारखे अनेक फिचर्स समाविष्ट आहेत.
Google Pixel 9 सीरीजमध्ये मिळतील हे अपग्रेड्स
Google Pixel 8 सीरीजच्या तुलनेत, आगामी Pixel 9 लाईनअप हार्डवेअर स्पेसिफिकेशन विभागात अनेक अपग्रेड्स येतील, ज्यामध्ये पाहिजे तो नवीन Tensor G4 प्रोसेसर असो किंवा 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा (Pixel 8 मध्ये Tensor G3 SoC आणि 10.5MP सेल्फी शूटर होता).
त्याचवेळी, Google Pixel 9 सीरीजमध्ये नवीन AI फिचर्स आणली जाण्याची दाट शक्यता आहे. तथापि, Pixel 9 सीरीज अँड्रॉईड 15 वर चालू नाही शकत, पण रिलीज झाल्यानंतर लवकरच अँड्रॉइडचे नवीन व्हर्जन मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, किमान दोन नवीन AI टूल्स लाईनअपमध्ये मिळतील जे Pixel स्क्रीनशॉट आणि Add Me असतील.
आतापर्यंत आम्हाला Pixel 9 सीरीजबद्दल हेच माहीत आहे, परंतु आम्हाला आशा आहे की 13 ऑगस्ट रोजी रिलीज झाल्यावर लाईनअपच्या स्पेसिफिकेशन आणि फिचर्स बद्दलची संपूर्ण माहिती येत्या काही दिवसांत अधिकृत होईल.