Hero Splendor सारखी दिसणारी electric bike लाँच, सिंगल चार्जमध्ये 140km रेंज

Hero Splendor बाईक कमी मेंटेनेंस आणि चांगल्या मायलेजमुळे भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय बाईक आहे. आता एका कंपनीनं स्प्लेंडरसारखी दिसणारी एक इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) भारतीय बाजारात सादर केली आहे. ही ई-बाईक इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप कंपनी ADMS eBikes नं शोकेस केली आहे. ADMS नं ही बॅटरी असलेली बाईक Boxer नावानं इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या मार्केटमध्ये सादर केली आहे. चला जाणून घेऊया या बाईक बाबत सर्वकाही.

Hero Splendor सारखी डिजाईन

Hero Splendor सारखी दिसणारी ही ई-बाईक बंगळुरूमध्ये आयोजित ग्रीन व्हेईकल एक्सपोच्या थर्ड एडिशनमध्ये शोकेस करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक असल्यामुळे कंपनीनं यात इंजिन नव्हे तर त्याजागी इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. त्यामुळे बाईकचा लुक थोडा वेगळा वाटतो. त्या व्यतिरिक्त ही बाईक पूर्णपणे हीरो स्पलेंडर सारखी दिसते. हे देखील वाचा: बॅड न्यूज! Bajaj Chetak electric scooter महागली; जाणून घ्या नवीन किंमत

एडीएमएस बॉक्सर (ADMS Boxer) मध्ये आयताकृती हेडलॅम्प, फ्रंट काउल, फ्रंट आणि रियर मडगार्ड, फ्यूल टँक, सीट डिजाइन आणि ग्रॅब रेल आहेत. जर तुम्ही लांबून ही बाईक बघितली तर ही तुम्हाला हीरो स्प्लेंडरच वाटेल. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रियर शॉक अब्जॉर्बरचा सस्पेंशन सेटअप देखील स्प्लेंडर सारखा वाटतो.

140KM ची रेंज

रेंज बाबत बोलायचे झाले तर यात 140 किमीची रेंज मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यासाठी ही बॅटरी असलेली बाईक ईको मोडमध्ये ड्राइव्ह करावी लागेल. कंपनीनं यात यात लिथियम-आयन बॅटरी दिली आहे जी हब माउंटेड मोटरला पावर देती आहे. ADMS Boxer मध्ये 3 राईड मोड मिळतात तसेच एक रिवर्स मोड देखील देण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक बाईक (electric bike) असल्यामुळे ADMS Boxer मध्ये काही खास फीचर्स देखील आहेत. यात वेगवेगळ्या हँडलबार डिजाइन आणि पोजिशनिंग, क्रोम-टिप्ड ग्रिप्स आणि यूनिक स्विच क्यूब आहे, तसेच कॉकपिट सेक्शन आणि ट्विन पॉड इंस्ट्रूमेंट कंसोलमध्ये ओळखीची डिजाइन मिळते. फ्यूल गेज बॅटरी पर्सेंटेज इंडिकेटरमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. लेफ्ट पॉडमध्ये स्प्लेंडर प्रमाणेच स्पीडोमीटर आणि मीलोमीटर आहे. डायलमधील ग्राफिक्स स्प्लेंडरपेक्षा वेगळे आहेत. ADMS Boxer चा मिड-सेक्शन पूर्णपणे फेयर्ड आहे आणि बॅटरी पॅक काढण्यासाठी कोणतीही ओपनिंग नाही. हे देखील वाचा: फक्त 10,599 रुपयांमध्ये घरी घेऊन या 140 किलोमीटर रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर

किंमत आणि उपलब्धता

अजूनतरी ADMS Boxer बाबत संपूर्ण माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच या बाईकच्या सेलबद्दल पण कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या बाईकची किंमत पाहता, एडीएमएस बॉक्सर बाईकची किंमत 1.25 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here