Honor 200 सीरिजची लाँचची तारीख ब्रँडने केले कंफर्म, पाहा फोनचा सुंदर लूक

ऑनर आपल्या नवीन डिजिट सीरिज 200 च्या विकासची घोषणा करत आहे. यात Honor 200 आणि Honor 200 Pro सारखे दोन मॉडेल येतील. ब्रँडने चीनमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करण्याची तारीख आणि लूकवरून पडदा उठविला आहे. हा येत्या 27 मे ला सेलसाठी उपलब्ध होईल. हेच नाही कंपनी वेबसाईटवर प्री-ऑर्डर पण केला जाऊ शकतो. चला, पुढे डिझाईन, फिचर्स आणि इतर माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Honor 200 सीरिज कलर आणि डिझाईन

  • Honor 200 आणि Honor 200 Pro चार कलरमध्ये उपलब्ध होतील. ज्यात ब्लॅक, पिंक, वाईट आणि ब्लूचा समावेश आहे.
  • दोन्ही फोनमध्ये बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल, LED फ्लॅश आणि जवळपास एकसारखी डिझाईन पाहायला मिळाली आहे.
  • Honor 200 आणि Honor 200 Pro फोनमध्ये मोठे अंतर आहे की सामान्य व्हेरिएंटमध्ये सेल्फीसाठी पंच-होल कटआऊट आहे, तर प्रो मध्ये पिल शेप नॉच देण्यात आले आहे.
  • फोनच्या उजव्या बाजूला वर पावर आणि वॉल्यूम बटन पाहायला मिळू शकते. तर बॅक पॅनलवर खालच्या बाजूला ऑनर ब्रँडिंग आहे.

Honor 200 सीरिजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: रिपोर्ट्सनुसार सीरिजच्या दोन्ही फोनमध्ये क्वॉड-कर्व्ड OLED पॅनल मिळण्याची शक्यता आहे.
  • प्रोसेसर: लीकनुसार Honor 200 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट आणि 200 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा: ऑनर 200 सीरिजमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो ज्यात 1/1.3-इंचाचा ओमनीव्हिजन OV50H कॅमेरा सेन्सर, f/1.9 अपर्चर आणि OIS ला सपोर्टसह दिला जाऊ शकतो. हेच नाही फोनमध्ये 50x डिजिटल झूम असलेला टेलीफोटो कॅमेरा असण्याची संभावना आहे. तसेच, सेल्फीसाठी ऑनर 200 मध्ये सिंगल आणि 200 प्रो मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी आणि चार्जिंग: Honor 200 आणि Honor 200 Pro डिव्हाईसमध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असू शकतो. दोन्ही फोनमध्ये 5,200mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता दोन्ही डिव्हाईस अँड्रॉईड 14 वर आधारित होऊ शकतात.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here