ऑनरने लॉन्च केला 4 जीबी रॅम आणि ट्रिपल कॅमेरा असलेला लो बजेट फोन HONOR 20E

ऑनरसाठी एप्रिलचा महीना खास आहे. या महिन्यात कंपनीने फ्लॅगशिप फोन Honor 30 आणि 30 Pro पासून मिड बजेट डिवाईस Honor 9X Lite, Honor Play 4T आणि 4T Pro लॉन्च केले आहेत. कंपनीने हे स्मार्टफोन जगातील वेगवेगळ्या बाजारांमध्ये आणले आहेत. आता बातमी येत आहे कि Honor ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन मोबाईल HONOR 20E लॉन्च केला आहे. ऑनरने हा फोन सध्या इटली मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काळात जगातील इतर बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Honor 20e कंपनीचा वॉटरड्रॉप नॉच असलेला फोन आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. ऑनर 20ई च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. तिन्ही कॅमेरा सेंसर एका रांगेत आहेत ज्याच्या खाली फ्लॅश लाईट आणि सेंसरची माहिती लिहिण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच खालच्या बाजूला Honor ची ब्रँडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Honor 20e 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.21 इंचाच्या फुलएचडी+ नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 9 वर सादर केला गेला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर बनलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या किरीन 710एफ चिपसेट वर चालतो. इटली मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च् केला आहे ज्यात 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 20e ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट असलेला एफ/1.8 अपर्चर असलेला 24 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या थर्ड रियर कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Honor 20e मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Honor 20e एक 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि 3.5एमएम जॅक सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 3400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ऑनर 20ई इटली मध्ये मीडनाईड ब्लॅक आणि फँटम ब्लू कलर मध्ये 149.90 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 12,450 रुपये होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here