5 डिसेंबरला येत आहे नोकियाचा 5 बॅक कॅमेरे असलेला फोन, अजूनही खूप काही लॉन्च करत आहे कंपनी

काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरु होती कि नोकिया लवकरच 5 कॅमेरे असलेला फोन आणू शकते आणि नुकतेच कंपनीच्या या फोनचे काही लीक्स पण आले होते. त्यामुळे कंपनी 5 कॅमेरे असलेल्या फोन वर काम करत आहे. तर आज नोकियाचे मालकी हक्क असणाऱ्या कंपनी एचएमडी ग्लोबलच्या अधिकाऱ्याने ट्विट केले आहे ज्यात माहिती देण्यात आली आहे कि कंपनी 5 डिसेंबरला दुबई मध्ये एक इवेंट करत आहे. त्यासोबत त्यांनी एक पोस्टर पण शेयर केला आहे ज्यात तीन फोनची माहिती आहे. त्यामुळे आशा आहे कि कंपनी यादिवशी नोकिया 9 सोबतच, नोकिया 8.1 आणि नोकिया 2.1 प्लस पण आणू शकते.

नोकियाच्या या इवेंटची माहिती एचएमडी ग्लोबल चे चीफ प्रोडक्ट आॅफिसर जुहो स​रविकास ने दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट सेवरून हा पोस्टर ट्विट केला आहे. ट्विट सोबत त्यांनी एक्सपेक्टेड मोर असे म्हटले आहे ज्यामुळे आशा आहे कि कंपनी या दिवशी मोबाईल व्यतिरिक्त काही इतर डिवाइस पण लॉन्च करू शकते.

राहिला प्रश्न नोकिया 9 चा तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 5 सेंसर असेलेला कॅमेरा सेटअप आहे. 91 मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी याचा रेंडर वीडियो शेयर केला होता ज्यात फोन स्पष्ट पणे दिसत आहे. फोन मध्ये दोन प्राइमरी कॅमेरा सेंसर्स असू शकतात, त्यासोबत एक टेलीफोटो लेंस आणि एक वाइड-एंगल लेंस असण्याची शक्यता आहे. यासोबत एक डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा पण असू शकतो. नोकिया 9 मध्ये पण कार्ल जेसिस के कॅमेरा सेंसर मिळतील. माहितीनुसार फोनच्या स्क्रीन वर फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. नोकिया 9 ग्लास सॅण्डविच डिजाईन सह लॉन्च केला जाऊ शकतो जो मेटल फ्रेमचा असेल.

Nokia 9

इतर स्पेसिफिकेशन पाहता यात 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 5.9-इंचाचा क्यूएचडी डिस्प्ले असू शकतो. नोकिया 9 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाऊ शकतो. सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 वर आधारित असेल. कंपनी कडून फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. आशा आहे कि हा फोन पाणी व धूळ अवरोधक असेल. तसेच पावर बॅकअप साठी नोकिया 9 मध्ये 4,150एमएएच ची बॅटरी असू शकते.

नोकिया 8.1 बद्दल नुकतीच बातमी आली होती. माहितीनुसार कंपनी हा 28 नोव्हेंबरला भारतात सादर करू शकते पण आता कदाचित याचे प्रदर्शन 5 डिसेंबरला दुबई मध्ये होईल. बातमीनुसार हा चीन मध्ये लॉन्च नोकिया एक्स7 आहे​ जो दुसऱ्या देशांत नोकिया 8.1 नावाने सादर केला जाईल. या फोन मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.18-इंचाची टीएफटी स्क्रीन मिळेल.

हा फोन स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर आधारित असेल जो क्वालकॉम चा सर्वात नवीन चिपसेट आहे. तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आणि फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअप साठी नोकिया 8.1 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएएच ची बॅटरी असेल.

Nokia 2.1

नोकिया 2.1 प्लस यात सर्वात कमी किंमत असलेला फोन असेल. काही दिवसांपूर्वी हा फोन यूएस सर्टिफिकेशन साइट एफसीसी वर लिस्ट करण्यात आला होता. लिस्ट करण्यात आलेल्या फोन मध्ये 1जीबी रॅम आणि 16स्टोरेज असल्याची माहिती देण्यात आली होती. बातमीनुसार या फोन मध्ये 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले असू शकतो. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 425 सह येऊ शकतो आणि फोन मध्ये 4000 एमएएच ची पावरफुल बॅटरी मिळू शकते. कॅमेरे पाहता यात एलईडी फ्लॅश सह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here