4,000 रुपयांनी स्वस्त झाला Honor 20i, आता फक्त 10,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार ट्रिपल कॅमेरा फोन

Honor ने यावर्षी इंडियन मार्केट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला स्मार्टफोन Honor 20i लॉन्च केला होता. कंपनीने हा डिवाईस 14,999 रुपयांमध्ये बाजारात आणला होता, जो स्मार्टफोन यूजर्सना खूप आवडला होता. आता आपल्या फॅन्सना भेट देत Honor ने या स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि Honor 20i ची किंमत थेट 4,000 रुपये कमी करण्यात येत आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 10,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Honor ने घोषणा केली आहे कि Honor 20i स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात होत आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 4,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यामुळे Honor 20i फक्त 10,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. Honor नुसार Honor 20i च्या मीडनाईट ब्लॅक कलर वेरिएंट वर हा प्राइज ड्रॉप केला गेला आहे आणि हा फोन शॉपिंग साइट अमेझॉन व फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. दुसरीकडे Honor 20i चा फँटम ब्लू कलर वेरिएंट या दोन्ही वेबसाइट्स वर 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या खास ऑफरचा लाभ 30 नोव्हेंबर पर्यंत घेता येईल.

Honor 20i

स्पेसिफिकेशन पाहता यात 6.21-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर किरिन 710 प्रोसेसर दिला जाईल. याचे तीन वेरिएंट सादर केले गेले आहेत. सोबतच यात 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी आहे जी 10 वाट चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ वर्जन 4.2, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here