आॅनर 7ए आणि आॅनर 7सी झाले भारतात लॉन्च, शाओमी ला मिळेल चांगली टक्कर, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

टेक कंपनी आॅनर ने काही दिवसांपूर्वी ग्लोबल लॉन्च च्या माध्यमातून भारतात आपला शानदार फ्लॅगशिप स्मार्टफोन आॅनर 10 लॉन्च केला होता. आॅनर 10 लॉन्च सोबत आॅनर इंडिया ने ही घोषणा पण केली होती की कंपनी लवकरच देशात दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन पण लॉन्च करेल. त्यानुसार आज कंपनी ने डिवाईस समोर आणले आहेत आणि आॅनर 7ए तसेच आॅनर 7सी नावाने दोन नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत.

आॅनर ने आॅनर 7ए 8,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तर आॅनर 7सी कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. फोन च्या 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वाल्या वेरिएंट ची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर फोन चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च ​झाला आहे. आॅनर 7ए 29 मे पासून फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तर आॅनर 7सी 31 मे ला अमेजॉन इंडिया वरून विकत घेता येईल.

आॅनर 7ए
हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 5.7-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1440 x 720 पिक्सल ला सपोर्ट करतो. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 1.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी एड्रेनो 505 जीपीयू ​आहे. फोन बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

आॅनर 7ए 3जीबी रॅम सह 32जीबी च्या इंटनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आॅनर 7ए मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. आॅनर 7ए रियल डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

आॅनर 7सी
हा फोन पण 18:9 आस्पेक्ट रेशियो डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर झाला आहे आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे. आॅनर चा हा फोन पण फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन च्या बॅक पॅनल वर पण 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही कॅमेरा सेटअप फ्लॅश सह येतात. आॅनर 7सी 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी आॅनर 7सी मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here