अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत कॉलरट्यून देणाऱ्या BSNL च्या प्लॅन्सची यादी

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ला खाजगी कंपन्यांनी 4G नेटवर्कमुळे मागे टाकले आहेत. परंतु गेले काही महिने प्रायव्हेट कंपन्यांच्या दरवाढीमुळे भारतीयांचा ओढा भारतीय संचार निगम लिमिटेडकडे वाढला आहे. BSNL देखील ग्राहकांना निराश करत नाहीत. कंपनीनं गेल्या काही महिन्यांत आपल्या दमदार प्रीपेड प्लॅन्स (BSNL Prepaid Plan) च्या जोरावर प्रायव्हेट कंपन्यांना मागे टाकत आहे.

एकीकडे Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. तर दुसरीकडे बीएसएनएल आपल्या युजर्सना (BSNL Users) कमी किंमतीत प्रीपेड प्लॅन्स देत आहे. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएल (BSNL PLANs/STVs) च्या अशा 5 प्लॅनची माहिती देणार आहोत जे अनलिमिटेड कॉलिंग (BSNL Unlimited Calling Plan) सह येतात. तसेच, लिस्टमधील काही प्लॅनमध्ये भरपूर डेटा देखील दिला जात आहे.

BSNL 5 Best Recharge Plans

  • BSNL STV 99
  • BSNL STV 118
  • BSNL STV 319
  • BSNL PV 999
  • BSNL PV 1499

BSNL चा 99 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएल (BSNL) चा हा एक स्पेशल टॅरिफ वाउचर आहे ज्याची किंमत 99 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा किंवा एसएमएस बेनिफिट्स मिळत नाहीत. परंतु, यात तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री PRBT सर्व्हिस देखील देण्यात आली, जिच्या मदतीनं तुम्ही तुमच्या आवडीची कॉलर ट्यून सेट करू शकता. या प्लॅनची वैधता 18 दिवस आहे.

BSNL चा 118 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या प्लॅनची किंमत 118 रुपये आहे आणि हा देखील एक स्पेशल टॅरिफ वाउचर आहे. या प्लॅनची वैधता 20 दिवस आहे. स्वस्त प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 0.5GB डेटा मिळतो, तसेच तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग करू शतक. या प्लेस सोबत PRBT सर्व्हिस मोफत मिळते. रोजचा 500 एमबी डेटा सम्पल्यावर देखील तुम्ही 40Kbps स्पीडनं इंटरनेट वापरू शकाल. या प्लॅनमध्ये तुम्हाला एसएमएसची सुविधा मिळत नाही.

BSNL चा 319 रुपयांचा प्लॅन

STV 319 रुपयांच्या प्लॅनबाबत बोलायचे झाले तर, यात युजर्सना 10GB डेटा, 300 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग बेनिफिट मिळतात. बीएसएनलच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनची वैधता 65 दिवस आहे.

BSNL चा 999 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या 999 रुपयांच्या प्रीपेड रीचार्ज प्लॅनची वैधता 200 दिवस आहे. परंतु PRBT सर्व्हिस मात्र 60 दिवस मोफत वापरता येते. उर्वरित कालावधीत ग्राहक अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकतात. कारण प्लॅनमध्ये डेटा आणि एसएमएसचा लाभ घेता येत नाही.

BSNL चा 1499 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता दिली जात आहे. या कालावधीत ग्राहकांना एकूण 24 जीबी इंटरनेट डेटा मिळेल. तसेच प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते तसेच रोज 100 SMS देखील मोफत मिळतील.

नोट: हे सर्व प्लॅन बीएसएनएल कर्नाटक सर्कलसाठी आहेत. परंतु, अन्य राज्यातील बीएसएनएल युजर्स देखील कंपनीच्या साईट किंवा BSNL कस्टमर केयरला कॉल करून या प्लॅन्सची उपलब्धता चेक करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here