Exclusive : Realme X पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, Spider-Man: Far From Home असेल स्पेशल एडिशन

Realme ने गेल्याच महिन्यात आपला पहिला पॉप-सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X टेक मंचावर सादर केला होता. हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारातच उपलब्ध आहे जो लवकरच भारतात येणार आहे. कंपनीने अजूनतरी Realme X च्या इंडियन लॉन्च डेट सांगितली नाही पण फोन लॉन्चच्या आधीच 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन भारतात Marvel च्या Spider-Man: Far From Home फिल्म सोबत येईल.

91मोबाईल्सला Realme X च्या लॉन्च डेटची माहिती नाही मिळाली पण इतके मात्र समजले आहे कि या स्मार्टफोन साठी कंपनीने Spider-Man: Far From Home फिल्म सोबत हात मिळवणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी Realme X चा स्पेशल एडिशन पण लॉन्च करेल जो Marvel च्या या आगामी फिल्मशी संबंधित असेल. कंपनी Realme X साठी Spider-Man: Far From Home थीम वर आधारित फोन कवर व केस पण बनवत आहे.

Realme X च्या Marvel’s Spider-Man: Far From Home एडिशनची माहिती समोर आल्यामुळे निश्चित झाले आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात फिल्मच्या रिलीज डेटच्या आसपास आपला आगामी स्मार्टफोन पण लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे मार्वलची पुढील स्पाइडर मॅन फिल्म भारतात 4 जुलैला लॉन्च होईल. त्यामुळे अशा आहे कि रियलमी पण जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातच Realme X भारतीय बाजारात लॉन्च करेल.

Realme X

Realme X चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाचा फुल एचडी+ एज-टू-एज ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 एसओसी आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. मागे डुअल कॅमेरा आहे. यात एक सेंसर 48-मेगापिक्सलचा आणि दुसरा डेप्थ सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे. Realme X मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एआई हाइपरबूस्ट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,765एमएएच ची बॅटरी VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह येते. फोन कलरओएस वर चालतो जो एंड्रॉइड 9 पाई बेस्ड आहे. आशा आहे कि भारतात हा स्मार्टफोन 18,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here