आॅनर के आगामी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस आॅनर नोट 10 काही दिवसांपूर्वी एका चीनी वेबसाइट वर रजिस्ट्रेशन साठी लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग आधी काही दिवस कंपनी ने आॅनर नोट 10 बद्दल एक टीजर पण शेयर केला होता. त्यानंतर स्पष्ट झाले होते की कंपनी लवकरच हा डिवाईस टेक जगासमोर ठेवेल. आता आॅनर ने आपल्या आगामी फ्लॅगशिप डिवाईस ची लॉन्च डेट सांगितली आहे. कंपनी ने सांगितले आहे की आॅनर नोट 10 येत्या 31 जुलै ला ग्लोबली सादर केला जाईल.
आॅनर कंपनी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून आॅनर नोट 10 च्या लॉन्च ची माहिती शेयर केली आहे. कंपनी ने घोषणा केली आहे की 31 जुलैला बीजिंग मध्ये एका ईवेंट चे आयोजन केले जाईल आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी आपला नवीन डिवाईस पहिल्यांदा जगासमोर आणेल. 31 जुलै ला हा फोन फक्त चीनी बाजारात सादर करण्यात येईल. तर आॅनर 30 ऑगस्ट ला बर्लिन मध्ये अजून एका ईवेंट चे आयोजन करून आॅनर नोट 10 ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च करेल.
आॅनर नोट 10 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कंपनी ने कोणतीही माहिती दिली नाही पण लीक्स नुसार हा डिवाईस 6.9-इंचाच्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार नोट 10 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल ज्यात 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असतील. तर सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
लीक्स नुसार आॅनर नोट 10 लेटेस्ट एंडरॉयड सह सादर केला जाईल तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत कंपनी च्या हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालेल. कंपनी या डिवाईस मध्ये 6जीबी रॅम देऊ शकते तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. आॅनर नोट 10 मध्ये एनएफसी सपोर्ट व यूएसबी टाईप सी सोबत 6,000एमएएच ची बॅटरी असेल.
आॅनर 2 वर्षांनंतर आपल्या नोट सीरीज मध्ये डिवाईस घेऊन येत आहे. आॅनर नोट 8 नंतर डायरेक्ट आॅनर नोट 10 लॉन्च होत आहे. या डिवाईस च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि आॅनर नोट 10 च्या किंमतीसाठी 31 जुलै ची वाट बघावी लागेल. त्याचबरोबर आशा व्यक्त केली जात आहे की 30 ऑगस्ट च्या ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी आॅनर आपला हा फ्लॅगशिप डिवाईस भारतात पण आणू शकते.















