20 एमपी सेल्फी, हेलो नॉच, 4जीबी रॅम आणि डुअल ​कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो वाई95

काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स ने माहिती दिली होती की चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी वीवो लवकरच भारतात आपला नवीन फोन वाय95 सादर करणार आहे आणि कालच कंपनी ने हा फोन सादर केला आहे. कमी रेंज मधील या फोन मध्ये हेलो नॉच फीचर्स आहे ज्याची सुरवात कंपनी ने आपल्या फ्लॅगशिप फोन वीवो वी11 पासून केली होती. भारतीय बाजारात वीवो वाय95 ची किंमत 16,990 रुपये आहे आणि हा फोन कंपनीच्या सर्व आॅफलाइन रिटेल स्टोर्स वर उपलब्ध होईल.

वीवो वाय 95 चे स्पेसिफिकेशन
वीवो वाय 95 मध्ये 6.22—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 1520 x 720 पिक्सल आहे. कंपनी ने यात फूल व्यू डिस्प्लेचा वापर केला आहे. पण स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती दिली नाही. 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर करण्यात आलेल्या या फोन मध्ये स्क्रीन वर छोटीशी नॉच दिसेल जीला कंपनी ने हेलो नॉच असे नाव दिले आहे. यावर सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट आधारित या फोन मध्ये आॅक्टाकोर (2×1.95गीगाहट्र्ज कोर्टेक्स-ए53 आणि 6×1.45गीगाहट्र्ज कोर्टेक्स ए53) प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वालकॉम चा हा नवीन प्रोसेसर आहे पण किंमत पाहता हा एवढा खास वाटत नाही. या प्राइस रेंज मध्ये 600 सीरीज चा चिपसेट असता तर तो चांगला असे म्हणता येईल. कंपनी ने हा 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

हा फोन फनटच ओएस 4.5 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे. वीवो वाय95 मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि तुम्ही 4जी वोएलटीई पण वापरू शकता. फोटोग्राफी पाहता बॅक पॅनल वर 13एमपी + 2एमपी चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला. त्याचबरोबर 20—मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेरा सोबत तुम्हाला प्रो मोड आणि फेस ब्यूटी सारखे आॅप्शन मिळतील.

वीवो वाय95 मध्ये 4,030 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही. फोन मध्ये माइक्रो यूएसबी पोर्ट 2.0 आहे. हा फोन स्टारी ब्लॅक , नेल्युला पर्पल रंगात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here