आॅनर ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की कंपनी लवकरच आपला नवीन दमदार डिवाईस नोट 10 या नावाने बाजारात आणेल. आॅनर नोट 10 बद्दल कंपनी ने एक टीजर पण शेयर केला आहे. कंपनी ने अजून पर्यंत फोन च्या स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेट चा खुलासा केला नाही पण चीन च्या एका वेबसाइट ने लॉन्च च्या आधी नोट 10 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स संबंधी महत्वाची माहिती दिली आहे.
आॅनर नोट 10 चीनी वेबसाइट जेडी डॉट कॉम वर लिस्ट करण्यात आला आहे. या वेबसाइट वर फक्त आॅनर नोट 10 चे स्पेसिफिकेशन्स नाहीत तर इथे नोट 10 साठी रजिस्ट्रेशन पण ओपन आहे. वेबसाइट वर रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख 25 जुलै असल्याचे सांगण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन ची अंतिम तारीख पाहता बोलले जात आहे की कि कंपनी 26 जुलै ला आॅनर नोट 10 चीनी मध्ये आॅफिशियली लॉन्च करेल.
आॅनर नोट 10 चे स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइट नुसार हा डिवाईस 6.9-इंचाच्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार नोट 10 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल ज्यात 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असतील. तर सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
लिस्टिंग नुसार आॅनर नोट 10 एंडरॉयड ओरियो वर सादर केला जाईल. या डिवाईस मध्ये एनएफसी सपोर्ट व यूएसबी टाईप सी सोबत 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल. आधी आलेले लीक पाहता नोट 10 मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते आणि हा डिवाईस आॅक्टा-कोर प्रोसेसर सह कंपनी च्या हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालेल.
आॅनर 2 वर्षांनंतर आपल्या नोट सीरीज मध्ये डिवाईस घेऊन येत आहे. आॅनर नोट 8 नंतर डायरेक्ट आॅनर नोट 10 लॉन्च होत आहे. या डिवाईस च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेट च्या आॅफिशियल अनाउंसमेंट साठी कंपनी च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.















