Amazon-Flipkart वर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर लिहिण्यात येईल ‘Made in India’, होत आहे मोठा बदल

भारत सरकारने कथितपणे फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि इतर ई-कॉमर्स कंपन्याना येत्या काळात आपल्या प्लॅटफॉर्म वर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर त्या देशाचे नाव लिहिण्यास सांगितले आहे, जिथे हि उत्पादने बनली आहेत. लवकरच ई-कॉमर्ससाठी या नवीन नियमावलीची घोषणा केली जाऊ शकते. या नियमावली नंतर कंपन्यांना आपल्या ग्राहकांना प्रोडक्ट बद्दल सांगावे लागेल कि प्रोडक्ट्स ‘Made In India’ आहेत कि नाही. तसेच कोणत्याही विक्रेत्याच्या गॅरेंटी विना प्रोडक्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर विकला जाणार नाही. हि बातमी अजूनतरी अधिकृत झाली नाही.

बिजनेस टुडेला एका अधिकाऱ्याने सांगितले कि आम्हाला सूचना मिळाल्या आहेत आणि तुम्हाला तर माहित असेल या नियमांना अजूनही अंतिम स्वरूप आले नाही. पण आमचे प्राधान्य अनावश्यक आयातीमध्ये कपात करण्याला आणि स्थानिक उत्पदनांना प्रोत्साहन देण्यास आहे. आम्ही स्थानिक उद्योगांना प्रोत्सहन देण्यासाठी योग्य ती पाऊले उचलू. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले, “आम्ही याबाबत सर्व ई-कॉमर्स कंपन्यांशी चर्चा करण्याची योजना बनवत आहोत कि याबाबत काय केले पाहिजे.” तसेच मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे कारण या नियमांना अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही.

तज्ञांच्या मते ई-कॉमर्ससाठी नवीन नियमावलीच्या नंतर आत्मनिर्भर भारत मिशनला प्रोत्साहन मिळेल. तसेच ग्राहकांकडे स्थानिक सामान विकत घेण्याचा पर्याय पण असेल. विशेष म्हणजे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) ने गेल्यावर्षी नॅशनल नेशनल ई-कॉमर्स पॉलिसी तयार केली होती.

हे देखील वाचा: जगभरात विकले जातील ‘Made in India’ Nokia फोन, चीनी ब्रँड्सना मागे टाकण्याचा दावा

बिजनेस टुडे नुसार, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये 70 टक्के चीन मध्ये बनवले जातात. काही लोकांच्या मते भारतातील उत्पादनांची किंमत जास्त असते. पण आता नवीन ई-कॉमर्स पॉलिसी नंतर स्वदेशी उत्पादने ओळखणे सोप्पे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here