भारतात लवकरच लॉन्च होईल 48-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला ऑनर वी20, यात आहे 3डी कॅमेरा

चीन मध्ये आयोजित इवेंट मधून हुआवाईच्या सब-ब्रँड ऑनर ने बुधवारी आपला लेटेस्ट ऑनर वी20 स्मार्टफोन लॉन्च केला होता. अनोख्या डिजाइन सह सादर करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता कंपनी लवकरच भारतीय मार्केट मध्ये सादर करणार आहे. याची माहिती ऑनर इंडिया ने आपल्या ऑफिशियल ट्विटर वरून दिली आहे. या ट्विट मध्ये कंपनी ने सांगितले आहे कि ऑनर वी20 ई-कॉमर्स वेबसाइट अमेजन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल केला जाईल.

ऑनर वी20 चे स्पेसिफिकेशन्स
ऑनर वी20 मध्ये 6.4-इंच की सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी ऑक्टा-कोर प्रोसेसर सोबत हुआवईचा किरीन 980 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन लिंक टर्बो टेक्नॉलॉजी सह येतो. हि टेक्नॉलॉजी फोन मध्ये इंटरनेटचा डाउनलोड स्पीड वाढवते. लिंक टर्बो तकनीक वाईफाई व एलटीई दोन्ही कनेक्टिविटी वर चालते. ऑनर वी20 एंडरॉयड 9 पाई वर सादर करण्यात आला आहे जो कंपनीच्या यूजर इंटरफेस ईएमयूआई 9 वर चालतो.

ऑनर वी20 मध्ये 6जीबी रॅम व 8जीबी रॅम चे दोन वेरिएंट्स आहेत. 6जीबी रॅम सोबत हा फोन 128जीबी मेमरी तसेच 8जीबी रॅम सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. अशाप्रकारे कपंनी ने 8जीबी रॅम सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मोशचिनो वेरिएंट पण चीन मध्ये लॉन्च केला होता. पण भारतात हा डिवाइस कोणत्या स्टोरेज मध्ये सादर केला जाईल याबद्दल सध्यातरी कोणतीही माहिती नाही.

डिवाइस मध्ये पंच होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो 25-मेगापिक्सलचा आहे.ऑनर वी20 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. ऑनर वी20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ऑनर ने या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ऑनर वी20 ब्लॅक, ब्लू तसेच रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

किंमत पाहता चीन मध्ये ऑनर वी20 च्या 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 2999 युआन (जवळपास 30,400 रुपये) तसेच 8जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 3499 युआन (जवळपास 35,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. तसेच ऑनर वी20 च्या 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 3999 युआन (जवळपास 40,500 रुपये) आहे. भारतात हा डिवाइस याच किंमतीच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here