5,100एमएएच बॅटरी, 8-इंचाची स्क्रीन आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला आॅनर वॉटरप्ले 8

टेक कंपनी आॅनर ने नुकताच अंर्तराष्ट्रीय मंचावर 6 कॅमेरे तसेच 8जीबी रॅम असलेला खूपच पावरफुल स्मार्टफोन मॅजिक 2 लॉन्च केला आहे. आॅनर मॅजिक 2 स्लाईडर पॅनल सह येतो ज्यावर सेल्फी कॅमेरा सेंसर आहे. स्लाईडर पॅनल मुळेच आॅनर मॅजिक 2 च्या डिस्प्ले वर कोणतीही नॉच व सेंसर दिसत नाही. तर आज आॅनर ने टेक मंचावर आपला वॉटरप्रूफ सेग्मेंट वाढवत अजून एक आणि नवीन डिवाईस आॅनर वॉटरप्ले 8 पण सादर केला आहे.

आॅनर वॉटरप्ले 8 सध्या चीनी बाजारातच लॉन्च करण्यात आला आहे तिथे हा दोन मॉडेल मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर वॉटरप्ले 8 टॅबलेटचा एक मॉडेल वाईफाई ला सपोर्ट करतो तर दुसरा मॉडेल एलटीई वर चालतो. वॉटरप्ले 8 वाईफाई मॉडेल मध्ये एक वेरिएंट 64 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच वॉटरप्ले 8 चा एलटीई मॉडेल 64जीबी इंटरनल मेमरी वर चालतो.

आॅनर वॉटरप्ले 8ची सर्वात मोठी खासियत याची वॉटरप्रूफ बॉडी आहे. हा डिवाईस आईपी67 रेटिंग सह सादर करण्यात आला आहे जी टॅबलेटला पाणी व धूळ अवरोधी बनवते. टॅबलेटचे अन्य फीचर्स व स्पे​सिफिकेशन्स पाहता यात 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 8-इंचाचा डब्ल्यूएक्सजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टॅबलेट एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.1 वर सादर करण्यात आला आहे जो आॅक्टा-कोर किरीन 659 चिपसेट वर चालतो.

वॉटरप्ले 8 चे दोन्ही मॉडेल 6जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतात तसेच यांची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. तर ग्राफिक्स साठी टॅबलेट मध्ये माली टी830-एमपी2 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅबलेटच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

आॅनर वॉटरप्ले 8 मध्ये एनएफसी, ब्लूटूथ व यूएसबी टाइप सी सारखे कनेक्टिविटी आॅप्शन्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी आॅनर ने आपल्या टॅबलेट मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,100एमएएच ची बॅटरी दिली आहे. किंमत पाहता वॉटरप्ले चा 64जीबी वाईफाई वेरिएंट 1499 युआन तर 128जीबी वाईफाई वेरिएंट 1899 युआन मध्ये लॉन्च झाला आहे. या किंमती इंडियन करंसी अनुसार 15,900 रुपये तसेच 20,900 रुपयांच्या आसपास आहेत. त्याचप्रमाणे आॅनर वॉटरप्ले 8 चा 64जीबी एलटीई मॉडेल 1799 युआन (जवळपास 19,000 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here