Honor ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि सीरीज अंतर्गत लेटेस्ट डिवाइस Honor X10 लॉन्च केला जाईल. हा फोन गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Honor 9X चा अपग्रेडेड वर्जन आहे जो आज कंपनीने चीनी बाजारात सादर केला आहे. ऑनर एक्स10 आर्कषक लुक सोबतच शानदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. हा फोन चीन मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काळात इंडियन मार्केट मध्ये पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ऑनर एक्स10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 92 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे जो चारही बाजुंनी बॉडी ऐजशी जोडला गेला आहे. फोन मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच देण्यात आलेली नाही. हा डिवाइस 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.63 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. Honor X10 स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो.
Honor X10 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला आहे जो मॅजिक यूआई 3.1.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह हुआवईचा किरीन 820 चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. फोन मध्ये ग्राफिक्ससाठी माली जी57एमपी6 जीपीयू आहे. चीन मध्ये हा फोन 6 जीबी रॅम व 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor X10 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 40 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX600 सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. त्याचबरोबर सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी ऑनर एक्स10 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Honor X10 डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी सोबतच 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 22.5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,300एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. ऑनर एक्स10 कंपनीने ब्लू, ब्लॅक, सिल्वर आणि ऑरेंज कलर मध्ये लॉन्च केला आहे.
किंमत पाहता Honor X10 चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 1899 युआन (जवळपास 20,000 रुपये), 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 2199 युआन (जवळपास 23,400 रुपये) आणि सर्वात मोठा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 2399 युआन (जवळपास 25,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.