भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची 4G सेवा संपूर्ण देशात सुरू होणार आहे. यासोबतच, अलीकडेच खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅनचे दर वाढवल्यानंतर वापरकर्ते बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. बीएसएनएल आंध्र प्रदेशच्या म्हणण्यानुसार, जुलै महिन्यात 2.17 लाख नवीन कनेक्शन आले आहेत. जुलै 2024 मध्ये खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्सनी दर वाढवल्यानंतर लोक बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बीएसएनएलचे नवीन सिम कार्ड (BSNL SIM card) घेतले असेल किंवा बीएसएनएलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असेल, चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएल सिम कार्ड (BSNL SIM card) कसे सक्रिय करायचे?
बीएसएनएल सिम कार्डला असे सक्रिय करा
तुम्ही बीएसएनएल चे नवीन सिम कार्ड (BSNL SIM card) प्रादेशिक मोबाइल वितरक, अधिकृत सेवा केंद्र इत्यादींकडून खरेदी करू शकता. एकदा तुम्ही तुमचे नवीन सिम कार्ड प्राप्त केल्यानंतर, ते वापरण्यासाठी तुम्हाला ते सक्रिय करावे लागेल. नवीन बीएसएनएल सिम कार्डला सक्रिय करण्यासाठी आपण खालील स्टेपचे अनुसरण करू शकता:
स्टेप-1: सर्व प्रथम तुमचे नवीन बीएसएनएल सिम कार्ड तुमच्या फोनमध्ये घाला, नंतर फोन रिस्टार्ट करा.
स्टेप-2: यानंतर मोबाईलमध्ये नेटवर्क सिग्नल येत आहे की नाही ते तपासा.
स्टेप-3: डिस्प्लेच्या शीर्षस्थानी नेटवर्क सिग्नल दिसत असल्यास, फोन ॲपला उघडा.
स्टेप-4: मग तुमची ओळख पटविण्यासाठी तुमच्या फोनवरून 1507 वर कॉल करा.
स्टेप-5: आता तुम्हाला तुमची भाषा, ओळख आणि पत्ता पुरावा इत्यादीबद्दल विचारले जाईल.
स्टेप-6: यानंतर टेली-व्हेरिफिकेशन दरम्यान सूचनांचे पालन करा.
स्टेप-7: व्हेरिफिकेशन प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, तुमचे बीएसएनएल सिम सक्रिय केले जाईल.
स्टेप-8: तुम्हाला तुमच्या फोनसाठी युनिक इंटरनेट सेटिंग्ज मिळतील. तुम्ही हे बदल सेव्ह केल्यावर तुमचे सिम कार्ड योग्यरित्या कार्य करेल.
स्टेप-9: आता तुम्ही या नवीन सिमचा उपयोग कॉलिंग आणि इंटरनेट सेवांसाठी करू शकता.
बीएसएनएलचे वापरकर्ते 123 डायल करून बॅलन्स जाणून घेऊ शकतात. यानंतर वापरकर्ते कॉल आणि सेवांसाठी त्यांचे सिम वापरणे सुरू करू शकतात.
बीएसएनएल सिम कार्डवर डेटा सेवा कशी सक्रिय करावी?
कोणत्याही आयफोन आणि अँड्रॉईडवर बीएसएनएलच्या सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्याला ‘बीएसएनएल डेटा ॲक्टिव्हेशन आणि डिॲक्टिव्हेशन ऑन प्रीपेड मोबाइल’ असे म्हणतात. यासाठी तुम्हाला तुमच्या बीएसएनएल मोबाईल नंबरवरून टेक्स्ट मेसेज पाठवावा लागेल, जसे की Start टाईप केल्यानंतर तुम्ही 1925 वर मेसेज पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला मोबाईल डेटा सेवा सक्षम करण्यात आली आहे, अशी सूचना प्राप्त होईल.
बीएसएनएल सिम ला USSD Codes सह कसे सक्रिय करावे?
तुम्ही 53734 या क्रमांकावर कॉल करून बीएसएनएल सिम त्वरित सक्रिय करू शकता. हा बीएसएनएल ॲक्टिव्हेशन युएसएसडी कोड आहे. तुमच्या बीएसएनएल VoLTE सिम ला सक्रिय करण्यासाठी या नंबरवर कॉल करणे हा एक सोपा मार्ग आहे.
प्रश्न आणि उत्तरे (FAQs)
नवीन बीएसएनएलच्या सिम कार्डला टेली-व्हेरिफिकेशननंतर सक्रिय होण्यासाठी किती वेळ लागतो?
नवीन BSNL सिम कार्ड सक्रिय होण्यासाठी सुमारे 30 मिनिटे ते 2 तास लागू शकतात. तरीही ते सक्रिय न झाल्यास, तुम्ही बीएसएनएल कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता. बीएसएनएल ग्राहक सेवा क्रमांक 1800-345-1500 (बीएसएनएलचे वापरकर्ते नसलेले) किंवा 1500 (बीएसएनएलचे वापरकर्ते) आहे.
मी बीएसएनएल टेलि-व्हेरिफिकेशन केल्यानंतर ही माझ्या फोनवर इंटरनेट वापरू शकत नाही, मी काय केले पाहिजे?
यासाठी तुम्हाला तुमच्या फोनचे सेटिंग चेक करावे लागेल. मोबाईल डेटा ॲक्टिव्हेशननंतरही तुम्हाला कनेक्टिव्हिटी समस्या येत असल्यास, या स्टेपचे अनुसरण करा:
अँड्राईड डिव्हाईसवर:
- सेटिंग्ज ॲपवर जा
- नेटवर्क आणि इंटरनेट वर टॅप करा.
- आता मोबाईल नेटवर्कवर टॅप करा.
- बीएसएनएल वर टॅप करा.
- खाली स्क्रोल करा आणि तुमच्या पसंतीचे नेटवर्क प्रकार पर्याय शोधा. त्यावर टॅप करा.
- आता 3G/4G/ऑटोमॅटिक वर टॅप करा. यानंतर तुमचा मोबाईल डेटा कार्य करेल.
आयओएस डिव्हाईसवर:
- सेटिंग्ज ॲपवर जा.
- सेल्युलर वर टॅप करा.
- सेल्युलर डेटा पर्यायावर टॅप करा.
- इनेबल 4G वर टॅप करा.
- आता ‘both voice and data’ पर्यायावर टॅप करा.
- यानंतर तुमचे इंटरनेट चालू झाले पाहिजे.
माझे बीएसएनएल सिम सक्रिय झाले आहे की नाही हे मला कसे कळेल?
जेव्हा तुम्ही बीएसएनएल नंबरवरून युएसएसडी कोड *124# डायल करता, तेव्हा टेलिकॉम कंपनी तुम्हाला बीएसएनएल सबस्क्रिप्शनची शिल्लक आणि वैधता याबद्दलच्या माहिती सोबत एसएमएस पाठवते.
बीएसएनएल सिम सक्रिय करण्यासाठी किती खर्च येतो?
तुम्ही 20 रुपये नाममात्र शुल्क भरून तुमचे प्रीपेड मोबाईल कनेक्शन पुन्हा सक्रिय करू शकता. तथापि, यासाठी तुम्हाला निष्क्रिय केल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत रिचार्ज करावे लागेल.
मुदत संपलेले बीएसएनएल सिम रिचार्ज करण्यासाठी किती खर्च येतो?
जेंव्हा तुमच्या प्रीपेड बीएसएनएल सिमची मुदत समाप्त होते, तेंव्हा तुमचे खाते निष्क्रिय होते. परंतु, त्यानंतर 15 दिवसांचा वाढीव कालावधी मिळतो. जर तुम्ही वाढीव कालावधीत तुमचे प्रीपेड कार्ड 20 रुपयांनी पुन्हा रिचार्ज केल्यास, तर नंबर सक्रिय राहील.