Homeटिप्स अँड ट्रिक्सFacebook Video अँड्रॉइड आणि आयफोनवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत
Facebook Video अँड्रॉइड आणि आयफोनवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत
Siddhesh Jadhav
Facebook वर एखादा व्हिडीओ आवडला तर तो डाउनलोड करणं सोपं आहे. फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी अनेक अॅप्स आहेत, परंतु तुम्ही कोणत्याही अॅप्सच्या मदतीनंविना देखील व्हिडीओज डाउनलोड करू शकता. ब्राउजरच्या माध्यमातून देखील फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करणं सोपं आहे. चला जाणून घेऊया की तुम्ही कशाप्रकारे फेसबुक व्हिडीओ अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर डाउनलोड करू शकता.
अँड्रॉइड फोनवर कसा करायचा फेसबुक व्हिडीओ डाउनलोड?
जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी फेसबुक अॅप ओपन केल्यानंतर त्या व्हिडीओवर टॅप करा, जो तुमच्या फोनवर डाउनलोड करायचा आहे.
तुम्हाला व्हिडीओच्या खाली शेयरचा ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा आणि मग पॉप अप मध्ये आलेल्या कॉपी लिंक ऑप्शनवर टॅप करा. फोनच्या ब्राउजर मध्ये fbdown.net साइट ओपन करा. म्हणजे जर तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर अॅड्रेस बारमध्ये fbdown.net टाइप करा किंवा या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला एक बार मिळेल, जिथे व्हिडीओ लिंक पेस्ट करावी लागेल. त्यानंतर डाउनलोडवर क्लिक करा.
नंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील: व्हिडीओ नॉर्मल क्वॉलिटीमध्ये डाउनलोड करणे किंवा HD क्वॉलिटीमध्ये. आता तुमच्या आवडीच्या ऑप्शनवर टॅप करा म्हणजे व्हिडीओ समोर येईल.
त्यानंतर तीन डॉट्स असलेल्या मेन्यूवर टॅप करा. मग व्हिडीओ डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करून व्हिडीओ डाउनलोड करा. त्यानंतर नोटिफिकेशन बारमध्ये डाउनलोड प्रोग्रेस दिसू लागेल. एकदा का व्हिडीओ तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झाला की तो तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या डाउनलोड फोल्डरमधून पाहता आणि शेयर करता येईल.
आयफोनवर कसा डाउनलोड करायचा फेसबुक व्हिडीओ?
आयफोनवर देखील फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्याची बऱ्यापैकी अँड्रॉइड फोनसारखी आहे. फेसबुक अॅप ओपन केल्यानंतर व्हिडीओ निवडा जो फोनवर डाउनलोड करायचा आहे.
व्हिडीओ खाली शेयरचा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप करा आणि मग पॉप अप मेन्यूमधून कॉपी लिंकवर टॅप करा. आता तुमच्या फोनमध्ये सफारी ब्राउजरच्या अॅड्रेस बारमध्ये fbdown.net साइट ओपन करा. साइट ओपन झाल्यानंतर एक बार मिळेल. जिथे कॉपी केलेली व्हिडीओ लिंक पेस्ट करा. आता डाउनलोडवर क्लिक करा.
इथे तुमच्या आवडीनुसार व्हिडीओ नॉर्मल किंवा एचडी क्वॉलिटीमध्ये डाउनलोड करण्याचा पर्याय मिळतो. एकाची निवड करा. व्हिडीओ सुरु होईल. व्हिडीओच्या खाली प्रोग्रेस बारमध्ये जा आणि तीन डाट्सवर टॅप करा. तिथून तुम्ही सेव्ह टू फाईल्स ऑप्शन निवडू शकता. तुमच्या फोनवर व्हिडीओ डाउनलोड झाल्यावर तुम्ही प्ले करू शकता.