Jio ची APN सेटिंग कशी बदलायची? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Reliance Jio भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे जी फक्त 4G नेटवर्क ऑपरेट करते. परंतु असं असून देखील कधी कधी इंटरनेट स्पीड 3G पेक्षा कमी मिळतो. अशी तक्रार अनेक युजर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतात. Jio च्या स्लो इंटरनेट स्पीडची दोन कारणं आहेत, एक तर तुम्ही जिथे राहता तिथे खराब नेटवर्क असू शकतं किंवा तुमच्या Android किंवा iOS डिवाइसवर तुम्ही चुकीचं Jio APN सेटिंग्स वापरत असू शकता. आपला सिग्नल स्ट्रॉंग असल्याचा दावा Jio नेहिमीच करत असते, तरीही देखील तुमचं इंटरनेट स्लो असेल तर तुम्ही तुमच्या जियो सिमची APN सेटिंग्स बदलू शकता. याची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

APN म्हणजे काय?

APN चा फुलफॉर्म अ‍ॅक्सेस पॉईंट नेम (Access Point Name) असा आहे, जी सर्व सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटी संबंधित मुख्य सेटिंग आहे. तुमच्या कॅरियरच्या मोबाईल नेटवर्कला इंटरनेटशी लिंक करण्याचा काम एपीएन करतं. प्रत्येक मोबाईल नेटवर्क कंपनीची एपीएन सेटिंग वेगळी आहे. योग्य एपीएन सेटिंग्स एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेम आणि अन्य अनेक कामांसाठी तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड वाढवू शकते.

Jio ची APN सेटिंग कशी बदलायची?

अँड्रॉइड आणि आयओएसवर APN सेटिंग बदलण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

Android युजर्ससाठी

  • सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड फोनच्या सेटिंगमध्ये जा.
  • स्क्रीनवर वायरलेस आणि नेटवर्क (किंवा वाय-फाय आणि नेटवर्क किंवा मोबाईल नेटवर्क) ऑप्शनवर क्लिक करा आणि सिम आणि नेटवर्कचा पर्याय निवडा.
  • सिम सेटिंगमधील Jio 4G SIM स्लॉटवर क्लिक करा.
  • नवीन इंटरनेट सेटिंग अ‍ॅड करण्यासाठी टॉप वर + साइनवर जा
  • त्यानंतर एपीएन फील्डमध्ये “JioNet” हे नाव सेट करा आणि उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करून सेव्ह करा.
  • नोट: एपीएन सेटिंग्स पुर्वव्रत करण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून डिफॉल्ट किंवा रीसेटवर क्लिक करा

आता तुम्ही तुमच्या Android फोनवर हाय-स्पीड इंटरनेट अ‍ॅक्सेस करू शकता. सेटिंग बदलून फोन रिस्टार्ट केल्यास तुम्हाला चांगला स्पीड मिळू शकतो.

iPhone युजर्ससाठी

विशेष म्हणजे iPhone मध्ये Jio APN सेटिंग बदलण्याची गरज पडत नाही कारण Apple डिवाइस APN स्वतःहून डिटेक्ट करू शकतात. त्यामुळे आयफोन युजर्सना कोणतेही सेटिंग न बदलता वेगवान इंटरनेट मिळू शकतं.

अजून काही टिप्स

जर तुमच्याकडे दुसऱ्या राज्यातील किंवा टेलिकॉम सर्कलमधील सिम असेल तर तुम्ही डेटा रोमिंग फिचर ऑन करून चांगला इंटरनेट स्पीड मिळवू शकता. तसेच काही स्मार्टफोनमध्ये फक्त पाहिलं सिमचं 4G ला सपोर्ट करत असल्यामुळे त्या सिम स्लॉटमध्ये जियोचं सिम टाकल्यास स्पीड वाढू शकतो.

Published by
Siddhesh Jadhav
Tags: Jio