जर तुम्हाला पण सतावत असेल ‘लो बॅटरी’ ची भीती, तर या 10 ट्रिक्स वापरून मिळवू शकता चांगला बॅकअप

बऱ्याचदा गंमतीने म्हटले जाते आहे कि ‘तुम्ही जेवणाविना राहू शकता पण मोबाईल फोनविना नाही’, परंतु यात थोडे सत्य दडले आहे. स्मार्टफोन सध्या लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच दिवसभर मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. टेक्नॉलॉजी एडवांस झाल्यामुळे मोबाईल फोन आधीपेक्षा जास्त पावरफुल होत आहेत ज्यात लोक सोशल मीडिया, गेम्स, चॅटिंग व फोटोग्राफी आवडीने करतात. हे स्मार्टफोन काम तर चोख बजावतात पण वारंवार यांची बॅटरी डिस्चार्ज होऊ लागते. बाहेर जाताना यूजर्सना भीती चिंता लागून राहते कि घरी येण्याआधी फोनची बॅटरी संपणार तर नाही ना. अनेकजण सोबत फोन चार्जर आणि पावरबॅंक पण घेऊन जातात. पण आज आम्ही तुम्हाला काही अश्या सोप्प्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी वाचवू शकता आणि चांगला बॅकअप मिळवू शकता. या ट्रिक्स फक्त फोन बॅटरी वाचवणार नाहीत तर फोनची परफॉर्मेंस आणि बॅटरीची हेल्थ पण चांगली ठेवतील.

1) ऑटो सिंक करा बंद

जेव्हा नवीन स्मार्टफोन घेता तेव्हा गूगल अकाउंटने लॉग-इन केली जाते. फोन मध्ये मेल आईडी च्या माध्यमातून सेटअप केला जातो आणि ऍप स्टोर ऍक्टिव्ह होतो. अनेकदा लोक गूगल अकाउंट सेटअप केल्यावर मेलचा ऑटो सिंक ऑन करतात. ऑटो सिंकमुळे एखादा नवीन मेल आल्यास नोटिफिकेशन्स येते. जरी तुम्ही मेलचा जास्त वापर करत नसाल तरीही बॅकग्राउंड मध्ये मेल इंटरनेटशी कनेक्टेड असतो आणि सतत सिंक होत असतो. ऑटो सिंकसाठी फोनची बॅटरी पण वापरली जाते. ऑटो सिंक टर्न ऑफ केल्यास फोन बॅटरीचा वापर कमी होईल.

2) लो ब्राइटनेस

आजकाल फोनची डिस्प्ले क्वॉलिटी शार्प असते ज्यात रंग पण सुस्पष्ट दिसतात. पण तुम्हाला सांगू इच्छितो कि डिस्प्ले ब्राइटनेस पण बॅटरी संपण्याचे एक मोठे कारण आहे. जितकी जास्त फोनची ब्राइटनेस असेल, बॅटरी पण तितकीच वापरली जाईल. त्यामुळे गरज नसल्यास फोनची ब्राइटनेस कमी करा. ब्राइटनेसमुळे बॅटरीचा वापर कमी करण्यासाठी ‘डार्क थीम’ नवीन ट्रेंड म्हणून समोर येत आहे. जमल्यास फोन मध्ये ऑटो ब्राइटनेस नेहमी चालू ठेवा.

3) ऍप करा क्लोज

फोन मध्ये गेम खेळत असताना एखादे काम आल्यास होम बटण दाबून किंवा फोन लॉक करून तुम्ही तुमचे काम करता. इंटरनेट सर्फिंग, सोशल मीडिया ऍप किंवा कॅमेरा वापरल्यानंतर पण अनेकजण होम बटण दाबून ते बंद करतात. पण तुम्हाला सांगू इच्छितो कि फक्त होम बटण दाबल्यामुळे ते फंक्शन पूर्णपणे बंद होत नाही उलट बॅकग्रांउड मध्ये ऍक्टिव्ह राहते आणि बॅटरी त्यासाठी वापरली जाते. त्यामुळे एखादा ऍप किंवा फीचर वापरल्यानंतर ते क्लोज म्हणजे बंद जरूर करा.

4) लोकेशन सर्विस करा बंद

जेव्हा एखादा नवीन ऍप फोन मध्ये इंस्टाल केला जातो तेव्हा त्याला लोकेशनचा ऍक्सेस पण दिला जातो. फोन मध्ये अनेक अशे ऍप्स असतात जे लोकेशन सतत ऍक्सेस करत असतात. हे ऍप्स सतत लोकेशन सर्विसशी कनेक्टेड असतात आणि यामुळे बॅटरी पण वापरली जाते. ज्या ऍप्सची गरज नाही त्यांची लोकेशन सर्विस स्टॉप करा आणि आवश्यक नसेल तर लोकेशन सर्विसच बंद करा.

5) बॅकग्रांउड रनिंग ऍप करा डि-एक्टिवेट

लोकेशन सर्विस प्रमाणेच अनेक डाउनलोडेड आणि प्री लोडेड ऍप्स आहेत जे चौवीस तास इंटरनेटशी कनेक्टेड राहतात. इंटरनेटशी कनेक्टेड राहिल्यामुळे एकीकडे इंटरनेट डेटा तर संपतोच पण सोबत बॅटरी पण खर्च होत असते. इथेही ज्या ऍपची गरज नसेल त्याचे बॅकग्रांउड रनिंग डिएक्टिवेट करा.

6) गरज असल्यास वाइब्रेशन आणि हॅप्टिक्स करा सेट

फोन कॉल असो वा मेसेज, नोटिफिकेशन्ससाठी रिंग सोबतच फोन वाइब्रेट पण होतो. जर तुम्ही व्हाट्सऍप वर चॅटिंग करत असाल तर फोन वारंवार वाइब्रेट होतो. त्याचबरोबर टाईप करताना ‘की’ प्रेस केल्यावर आवाज येतो. हा आवाज आणि वाइब्रेशन पण फोनची बॅटरी खातो. त्यामुळे गरज नसल्यास फोन वाइब्रेशन आणि हॅप्टिक्स बंद ठेवा.

7) ऑटो लॉक ड्यूरेशन टाईम ठेवा कमी

फोन वापरल्यानंतर जेव्हा पॉकेट किंवा टेबल वर ठेवता तेव्हा काही काळ स्क्रीन लाइट चालू असते. काहीजण फोन मध्ये आपल्या आवडीचा स्क्रीन सेवर आणि वॉलपेपर ठेवतात, जो फोन वापरात नसल्यास डिस्प्ले वर येतो. पण या फीचर्स मुळे फोनची बॅटरी खर्ची पडते. त्यामुळे बॅटरी जास्त वेळ वापरण्यासाठी स्क्रीन ऑफ करा किंवा ऑटो लॉक ड्यूरेशन टाईम कमी करा.

8) विनाकारण वाई-फाई / ब्लूटूथ ऑन ठेऊ नका

आजकाल वायरलेस ब्लूटूथ हेडफोनचा ट्रेंड सुरु आहे. स्मार्टफोन यूजर मोठ्या प्रमाणात अश्या ऍक्सेसरीज वापरत आहेत. सहाजिक आहे कि वाई-फाई आणि ब्लूटूथ पण फोन बॅटरी वापरतात. त्यामुळे गरज नसल्यास फोन मध्ये वाई-फाई आणि ब्लूटूथ सारखे फीचर्स बंद करा.

9) फ्लाइट मोडची मदत घ्या

फोनची बॅटरी खूप कमी झाली असेल आणि चार्ज करण्याचा ऑप्शन नसेल तर फोन फ्लाइट मोड वर टाकणे केव्हाही चांगले. आणि जेव्हा जास्त गरज असेल तेव्हा फ्लाइट मोड बंद करून कॉल करा. लक्षात घ्या फोन ऑफ करून ऑन करण्यात जास्त बॅटरी खर्च होते आणि फ्लाइट मोड वर फोन ऑन ठेवल्याने बॅटरी कमी खर्च होते.

10) बॅटरी ड्रेन होण्याआधीच करा चार्ज

जर तुम्हाला तुमच्या फोनची बॅटरी कोणत्याही बिघडाविना दीर्घकाळ वापरायची असेल तर बॅटरीची काळजी घेतली पाहिजे. बॅटरीची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी बॅटरी दरवेळी कमीत कमी 20 टक्क्यांवर चार्ज करावी, बॅटरी यापेक्षा जास्त ड्रेन होऊ देऊ नये.

Published by
Siddhesh Jadhav