हुवावेचा फोल्ड स्मार्टफोन Huawei Nova Flip पुढील महिन्यात 6 ऑगस्टला होम मार्केट चीनमध्ये लाँच होणार आहे. ब्रँडने डिव्हाईसबद्दल काही दिवसांपूर्वी टिझर व्हिडिओ शेअर केला होता. तसेच, आता फोनचा लाईव्ह फोटो समोर आला आहेत. ज्यात अचूक डिझाईन पूर्णपणे दिसली आहे. चला, पुढे जाणून घेऊया नवीन फ्लिप मोबाईल कसा आहे आणि यात स्पेक्स कसे असतील.
Huawei Nova Flip लाईव्ह फोटो
- हुवावे सेंट्रलच्या माध्यमातून नवीन मोबाईल हुवावे नोवा फ्लिपचा लाईव्ह फोटो समोर आला आहे.
- Huawei Nova Flip फोनला पांढऱ्या कलरमध्ये दाखविण्यात आले आहे, जो टिझर व्हिडिओ मध्ये दिसला आहे.
- तुम्ही खाली फोटोमध्ये पाहू शकता की फोनच्या चौकोर कव्हर स्क्रीनला एक आयताकृती मॉड्यूलमध्ये ठेवण्यात आले आहे. ज्यात ड्युअल कॅमेरा सेटअप पण आहे.
- स्मार्टफोनमध्ये कव्हर डिस्प्ले, चमकदार बॅक पॅनल आणि राऊंडेड बॉडी स्ट्रक्चर दिसत आहे.
- मायक्रो ब्लॉग्गिंग साईट वीबोवर पण Huawei Nova Flip फोनचे अनेक फोटो दिसले आहेत.
- वीबोवर स्मार्टफोनला चार वेगवेगळ्या रंगामध्ये शेअर करण्यात आले आहे. यात डिस्प्ले चारही बाजूला बेजल सह पंच होल कटआऊट फ्लॅट डिस्प्ले पाहायला मिळत आहे.
- Huawei Nova Flip स्मार्टफोनमध्ये 480 x 480 पिक्सल रिजॉल्यूशन वाली 2.1 इंचाची कव्हर स्क्रीन आणि 2690 x 1136 पिक्सल रिजॉल्यूशन असणारी मेन स्क्रीन दिली जाऊ शकते.
- लीक फोटोमध्ये हे पण समजले आहे की फोन HarmonyOS 4.2 व्हर्जनवर चालेल.
Huawei Nova Flip चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)
- डिस्प्ले: आतापर्यंत आलेल्या लीकनुसार Huawei Nova Flip मध्ये 6.94 इंचाचा LTPO OLED पॅनल मिळू शकतो. यावर 2690 x 1136 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेस काला सपोर्ट असू शकतो. डिव्हाईसमध्ये 2.14 इंचाचा OLED आऊटर डिस्प्ले मिळू शकतो यावर 60Hz रिफ्रेश रेट प्रदान केला जाऊ शकतो.
- चिपसेट: नोवा फ्लिप मध्ये किरिन 9-सीरीज जी-फ्री चिपसेट सादर केली जाऊ शकते.
- स्टोरेज आणि रॅम: फोनसाठी 12GB RAM + 256GB स्टोरेज, 12GB RAM + 512GB स्टोरेज आणि 12GB RAM + 1TB स्टोरेज सारखे मॉडेल येऊ शकतात.
- कॅमेरा: डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा लावला जाऊ शकतो. तर बॅक पॅनलवर 1/1.56 इंचाचा सेन्सर साईज असलेला 50 मेगापिक्सलचा RYYB प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेन्स असण्याची चर्चा आहे.
- बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत नवीन फोन 4,400mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह ठेवला जाऊ शकतो.















