Samsung Galaxy A32 वर मिळत आहे 11,000 रुपयांचा फायदा, अश्याप्रकारे घ्या लाभ

Samsung ने गेल्या महिन्यात भारतात आपला मिडबजेट सेग्मेंटमध्ये विस्तार करत Samsung Galaxy A32 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा मोबाईल फोन 64एमपी क्वॉड रियर कॅमेरा आणि 20एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. स्टाईलिश लुक असलेला हा स्मार्टफोन सॅमसंगने 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता पण आता सॅमसंगच्या चाहत्यांसाठी कंपनी खूप शानदार ऑफर घेऊन आली आहे. जे लोक सॅमसंग गॅलेक्सी ए32 विकत घेऊ इच्छित आहे त्यांच्याकडे हा फोन विकत घेण्याची सुवर्णसंधी आहे. ऑफरअंतगर्त Samsung Galaxy A32 11,000 रुपये स्वस्त झाला आहे त्यामुळे फोन फक्त 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

अशी आहे ऑफर

Samsung Galaxy A32 वर कंपनीने एकसाथ तीन ऑफर्स सादर केल्या आहेत आणि कोणतेही ग्राहक या तिन्ही ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. सॅमसंगच्या या स्कीमअंतगर्त गॅलेक्सी ए32 च्या किंमतीत एकूण 11,000 रुपयांचे बेनिफिट मिळत आहेत त्यामुळे फोनची किंमत 21,999 रुपयांवरून 10,999 रुपये होत आहे. चांगली गोष्ट अशी आहे कि या सॅमसंग ऑफरचा लाभ ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच ऑफलाईन मार्केटमध्ये आपल्या नजीकच्या रिटेल स्टोरवर पण घेता येईल. हि ऑफर आज म्हणजे 6 एप्रिलला सुरु झाली आहे आणि 30 एप्रिल पर्यंत चालेल.

असा मिळेल फायदा

सॅमसंग गॅलेक्सी ए32 ऑफलाईन रिटेलवरून विकत घेतल्यास कंपनी फोनवर 3,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देत आहे. या सुटीनंतर फोनची किंमत 21,999 रुपयांवरून 18,999 रुपये होते. डिस्काउंटव्यतिरिक्त कंपनीने फोनवर एक्सचेंज ऑफर पण जारी दिली आहे ज्या अंतर्गत युजर्सना 8,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकनंतर फोनची किंमत 18,999 रुपयांवरून कमी होऊन 10,999 रुपये होईल. म्हणजे डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळून 21,999 रुपयांच्या Samsung Galaxy A32 ची इफेक्टिव प्राइस 10,999 रुपये होईल.

Samsung Galaxy A32

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए32 मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे जी 800nits ब्राइटनेसला सपोर्ट करते. अँड्रॉइड 11 आधारित या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे जो ग्राफिक्ससाठी माली-जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : IPL 2021: असे केल्यास Jio युजर बघू शकतील प्रत्येक मॅच मोफत

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A32 मध्ये क्वाड कॅमेरा मागे देण्यात आला आहे. या सेटअप बद्दल बोलायचे तर यात 64MP (f/1.8 अपर्चर) प्राइमरी सेंसर, 8MP (f/2.2 अपर्चर) अल्ट्रा-वाइड लेंस, 5MP (f/2.2 अपर्चर) डेप्थ सेंसर आणि 5MP (f/2.4 अपर्चर) मॅक्रो लेंस आहे. तसेच फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगचे काम करेल.

त्याचबरोबर फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सिक्योरिटीसाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4G LTE, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तसेच, फोन अँड्रॉइड 11-बेस्ड OneUI 3.0 कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here