लेदर बॅक आणि ड्यू ड्रॉप डिस्प्ले सह लॉन्च झाला हुआवई वाय6 प्रो स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत

चीनची टेलीकम्युनिकेशन कंपनी हुवावे ने गेल्या आठवड्यात श्रीलंकेत आपले तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले होते. यात हुआवई वाय9 (2019), हुआवई वाय7 प्रो (2019) आणि हुआवई वाय6 चा समावेश होता. यातील हुआवई वाय9 आणि वाय7 प्रो भारतात लॉन्च केले गेले आहेत. पण वाय6 प्रो (2019) अजूनतरी भारतात आला नाही. आशा आहे कि कंपनी आपल्या वाय सीरीज मध्ये हा फोन इंडियन मार्केट मध्ये सदार करू शकते.

वाय6 प्रो (2019) च्या लॉन्चची माहिती जायदअतफ नावाच्या ट्विटर यूजर ने दिली आहे, ज्यावर लीक्सटर रोलँड क्वांड्ट ने रिप्लाई पण केला आहे. ट्विट मध्ये फोन श्रीलंकेत लॉन्च होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. फोन मध्ये 6.09-इंचाचा (1520 x 720 पिक्सल) ड्यू ड्रॉप फुलव्यू डिस्प्ले असेल. तसेच फोनची बॅक लेदरने कवर करण्यात आली आहे जी याला प्रीमियम लुक देते.

वाय6 प्रो 2019 कंपनी अंबर ब्राउन आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करेल. तसेच फोन मध्ये 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच फोटोग्राफीसाठी फोन मध्ये सिंगल 13-मेगापिक्सलचा रियर सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिगं साठी 8-मेगापिक्सल सेंसर नॉच डिस्प्ले मध्ये आहे. डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरच्या जागी कंपनी ने फेस अनकॉल सिस्टम दिली आहे, ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे कि हि लो लाइट मध्ये पण चांगली चालते.

वाय6 प्रो 2019 ईएमयूआई 9.0 बेस्ड एंडरॉयड 9 पाई वर चालतो. तसेच डिवाइस मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण डिवाइस कंपनीच्या श्रीलंकन वेबसाइट वर लिस्ट केला गेला नाही त्यामुळे फोनच्या किंमतीची माहिती उपलब्ध नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here