चार कॅमेरा आणि 4,000 एमएएच बॅटरी असलेला हुआवई वाय9 (2019) आज होईल सेल साठी उपलब्ध

मोबाईल फोन बनवणऱ्या कंपनी हुआवई ने गेल्या आठवड्यात आपला हुआवई वाय9 (2019) स्मार्टफोन लॉन्च केला होता जो आज पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हुआवई वाय9 (2019) एक्सक्लूसिवली फक्त ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन इंडिया वर विकला जाईल. डिवाइसची खासियत म्हणजे यात दोन फ्रंट आणि दोन रियर कॅमेरा आहेत.

हुआवई वाय 9 (2019) ची किंमत 15,999 रुपये आहे आणि हा अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल. या किंमतीत तुम्ही डिवाइसचा 4 जीबी रॅम/ 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंट घेऊ शकाल. स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि सफायर ब्लू रंगात उपलब्द आहे. तसेच आज होणाऱ्या वाली सेल मध्ये ग्राहकांना बोट रोकर्ज स्पोर्ट्स ब्लुटूथ हेडफोन दिले जात आहेत ज्यांची किंमत 2,990 रुपये आहे.

हुआवई वाय 9 (2019) चे स्पेसिफिकेशन
हुआवई वाय 9 (2019) कंपनी ने नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. सध्या वॉटर ड्रॉप आणि ड्यू ड्रॉप नॉच ट्रेंड मध्ये असताना यात साधारण नॉच आहे. नॉच वरच तुम्हाला डुअल सेल्फी कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये 6.5—इंचाचा 1080×2340 पिक्सल रेजल्यूशन असलेला आईपीएस डिस्प्ले आहे.

फोन हुआवईच्या किरीन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्रजचा क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर चालतो जो हुआवई इमोशन यूआई 9 वर आधारित आहे.

खास बाब अशी कि हुआवई वाय 9 (2019) मध्ये तुम्हाला फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. बॅक पॅनल मध्ये 13 एमपी + 2 एमपी चा डुअल कॅमेरा सेंसर आहे तर फ्रंटला 16 एमपी + 2 एमपी चा कॅमेरा सेंसर आहे. दोन्ही कॅमेरा मध्ये तुम्हाला बोके इफेक्ट आणि ब्लर बॅकग्राउंड सारखे ऑप्शन मिळतील. तसेच फोन मधील कॅमेऱ्यात एआई सपोर्ट पण आहे.

डेटा आणि कनेक्टिविटी साठी फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. कंपनी ने हा 4जी वोएलटीई सपोर्ट सह सादर केला आहे आणि वाईफाई व ब्लूटूथ सपोर्ट पण आहे. पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. सोबत तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर पण मिळेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here