हुआवाई ने सोमवारी भारतात आपल्या मिड-रेंज सेगमेंट मध्ये हुआवाई वाय 93 स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनी आपला एंट्री-लेवल फ्लॅगशिप भारतात सादर करण्यास तयार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी ने माहिती दिली होती कि वाय9 (2019) 7 जानेवारीला सादर केला जाईल. पण आता कंपनी ने मीडिया इनवाइट पाठवले आहे, ज्या नुसार 10 जानेवारीला आयोजित केल्या जाणाऱ्या इवेंट मध्ये हा डिवाइस सादर केला जाईल.
कंपनी आधीच चीन मध्ये हा फोन लॉन्च केला आहे. परंतु काही दिवसांपूर्वी हुआवईचा हा फोन अमेझॉन इंडियाच्या वेबसाइट वर लिस्ट केला गेला होता, ज्यानुसार डिवाइस 7 जानेवारीला सादर केला जाणार होता. पण असे झाले नाही आणि आता कंपनी ने दिल्ली मध्ये आयोजित इवेंटची माहिती दिली आहे.
सध्या आम्हाला हुआवाई वाय 9 (2019) च्या किंमतीची निश्चित माहिती मिळालेली नाही. पण आशा आहे कि मिड-रेंज स्पेसिफिकेशन्स सह सादर केला जाणारा हा डिवाइस 15,000 रुपयांच्या आत लॉन्च केला जाऊ शकतो. डिवाइस अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव विकला जाईल.
चीन मध्ये हा डिवाइस आधीच लॉन्च झाला आहे त्यामुळे आम्हाला डिवाइसचे काही स्पेसिफिकेशन्स समजले आहेत. हुआवाई वाय9 मध्ये 6.5-इंच डिस्प्ले सह हुआवाई किरिन 710 प्रोसेसर असेल. सोबत डिवाइस मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज तसेच यात 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज आहे.
फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. यात 16-मेगापिक्सल एफ2.0 प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल एफ2.4 डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला 13+2-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर वाय9 2019 ईएमयूआई 8.2 बेस्ड एंड्रायड 8.1 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल.















