Xiaomi पुन्हा एकदा भारतीय बाजारात नवीन Redmi फोन आणण्याची तयारी करत आहे. याबाबतीत कंपनीने टीजर प्रकाशित केला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी 12 मार्चला एक ऑनलाइन इवेंटच्या माध्यमातून Redmi Note 9 सादर करू शकते. तसेच Redmi Note 9 Pro पण सादर केला जाऊ शकतो. Redmi फोनचा टीजर शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी शेअर केला आहे.
मनु कुमार जैन यांनी सर्वात आधी ट्विटर वर एक फोटो टीजर प्रकाशित केला. यात नवीन रेडमी फोन लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोस्ट मध्ये सविस्तर माहिती नव्हती. त्यानंतर Redmi India ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडेल वरून बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंघचा एक वीडियो प्रकाशित केला आहे, ज्यात रणवीर रेडमी नोट 9 च्या नावाचा खुलासा करत आहे. आता मनु कुमार जैन यांनी अजून एक ट्विट करून स्पष्ट केले आहे कि 12 मार्चला रेडमी नोट 9 लॉन्च केला जाईल.
Behold the answer to the most awaited question of 2020. Yes, the next #RedmiNote launches on March 12! ?
Brace yourselves because #ProCamerasMaxPerformance is going to be nothing like you've ever seen before! ?
RT with #ILoveRedmiNote to share this EPIC moment.#Xiaomi ❤️️ pic.twitter.com/NDwPjW9Wwh
— Manu Kumar Jain (@manukumarjain) March 2, 2020
Redmi ने नवीन फोन साठी अमेझॉन वर पेज बनवले आहे. कंपनी रेडमी नोट 8 प्रमाणे Redmi Note 9 अमेझॉन वर एक्सक्लूसिव विकला जाईल. अमेझॉन इंडिया वर बनवण्यात आलेल्या पेज वर फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झालेला नाही. पण स्पष्ट झाले आहे कि फोन मध्ये रियर पॅनल वर क्वाड कॅमेरा असेल.
My main man @RanveerOfficial. Of course 9️⃣ ayega. And it'll be here very soon. ?
Legend says that it takes only 9️⃣ secs to spot the 9️⃣ in this photo! ?
Mi Fans, are you fast enough? Screenshot it & tweet with #ILoveRedmiNote!
9 से 12 होने का time आ गया है! #Xiaomi #Redmi ❤️ https://t.co/i6IoQq82gO pic.twitter.com/qC9bIr8Hox
— Manu Kumar Jain (@manukumarjain) March 2, 2020
आम्ही आधीच सांगितले होते कि कंपनीने Redmi Note 9 सीरीजच्या दिशेने इशारा केला आहे. लक्षात असू द्या कि कंपनीने गेल्यावर्षी Redmi Note 7 सीरीज फेब्रुवारी 2019 मध्ये लॉन्च केला होता. त्याच पद्धतीने कंपनी रेडमी नोट 9 सीरीज लॉन्च करू शकते. गेल्यावर्षी ऑक्टोबर मध्ये Redmi Note 8 सीरीज लॉन्च केली गेली होती.
Guess what's common between @RanveerOfficial and all of us? Everyone wants to know, when is _ _ _ _ coming?! ?
Can't blame y'all. Only @manukumarjain knows the answer.
How about you RT with hashtag #ILoveRedmiNote. 9⃣9⃣9⃣ RTs, we'll unlock the answer.
Sabka time ayega! ? pic.twitter.com/KnAluzMKnq
— Redmi India (@RedmiIndia) March 2, 2020
अलीकडेच एका रिपोर्ट मध्ये दावा केला गेला होता कि रेडमी 9 मध्ये मीडियाटेक हीलियो जी70 प्रोसेसर असेल आणि हा 2020 मध्ये पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाईल. अजूनतरी कंपनीने या सीरीज मधील कोणत्याही फोन बद्दल अधिकृत माहिती दिली नाही.
आशा आहे कि येत्या काळात लवकरच रेडमी नोट 9 ची माहिती समोर येईल. पण रणवीर सिंघने आपल्या वीडियो टीजर मध्ये रेडमी नोट 9 च्या नावाचा खुलासा बोलण्यातून केला आहे. तर मनु कुमार जैन यांनी फोटो पोस्टच्या टेक्स्ट मध्ये 12 नंबरचा उल्लेख केला आहे, ज्यावरून बोलले जात आहे कि येत्या 12 मार्चला Redmi Note 9 सीरीज लॉन्च केली जाईल.














