अजून हुआवईच्या नोवा फोनच्या बातम्या थांबल्या नव्हत्या कि अचानकपणे हुआवईच्या नवीन फोन वाय9 ची बातमी आली. कंपनीने चीन मध्ये हा फोन लॉन्च केला होता. परंतु काल अचानक हुआवईचा हा फोन अमेझॉन इंडियाच्या वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला. त्यामुळे स्पष्ट झाले कि लवकरच हा फोन भारतात येणार आहे आणि संध्यकाळी कंपनी ने मीडिया इनवाइट पण शेयर केले आहे. 7 जानेवारीला हा फोन भारतात लॉन्च केला जाईल. दिल्लीत आयोजित एका इवेंट मधून कंपनी हा सादर करणार आहे.
या डिवाइसचा लँडिंग पेज अमेझॉन इंडिया वर लाइव केल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी हा अमेझॉन वर एक्सक्लूसिव सेल करणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या होम मार्केट मध्ये मिड-रेंज हॅन्डडसेट हुआवाई वाय9 (2019) लॉन्च केला होता.
या लिस्टिंग मध्ये डिवाइसच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. यात 6.5-इंचाचा नॉच डिस्प्ले फुलएचडी+ रिज्यूलेशन सह असेल. तसेच फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आणि जीपीयू टर्बो फीचर देण्यात येईल. पण रॅम आणि स्टोरेज बद्दल अमेझॉन वर कोणतीही माहिती नाही.
या किंमतीती होऊ शकतो लॉन्च
आम्हाला हुआवाई वाय 9 (2019) च्या किमतीची माहिती नाही पण अशा आहे कि मिड-रेंज स्पेसिफिकेशन्स सह सादर होणार हा डिवाइस 15,000 रुपयांच्या आत लॉन्च केला जाऊ शकतो. डिवाइस अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव विकला जाईल.
चीन मध्ये हा डिवाइस 6.5-इंच डिस्प्ले हुआवाई किरिन 710 प्रोसेसर सह लाँन्च झाला आहे. सोबत डिवाइस मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज तसेच यात 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. यात 16-मेगापिक्सल एफ2.0 प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल एफ2.4 डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला 13+2-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर वाय9 2019 ईएमयूआई 8.2 बेस्ड एंड्रायड 8.1 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल.















