Xiaomi ने दिली Realme ला मात, रियलमीचा मार्केट शेयर 29.13 टक्क्यांवरून आला 7.32 टक्क्यांवर

इंडियन स्मार्टफोन मार्केट जगाच्या मोबाईल बाजाराचा मोठा भाग आहे. जर एखादा स्मार्टफोन ब्रँड भारतात हिट झाला तर ग्लोबल मंचावर पण त्याचा मार्केट शेयर मोठा आहे. हे टेक ब्रँड्सना पण चांगलेच माहित आहे आणि म्हणूनच त्यांच्या स्ट्रॅटेजी मध्ये इंडियन यूजर्स आणि त्यांच्या गरजांना महत्व दिले जाते. भारतीय स्मार्टफोन बाजारावर नजर ठेवणाऱ्या रिसर्च फर्म आईडीसीने इंडियन मार्केट आणि यातील स्मार्टफोन ब्रँड्सचा एक नवीन रिपोर्ट सादर केला आहे ज्यात साल 2019 च्या शेवटच्या तिमाहीचे आकडे शेयर केले गेले आहेत कि कोणता ब्रँड किती पुढे आहे आणि कोणत्या ब्रँडला नुकसान सहन करावे लागले. रिपोर्ट मध्ये महत्वाचा खुलासा झाला आहे कि वर्ष 2019 च्या शेवटी Xiaomi आणि Samsung ने जबरदस्त परफॉर्मंस दिली आहे तर Realme मागे राहिली आहे.

IDC ने आपल्या या रिपोर्ट मध्ये Xiaomi, Samsung, Realme, OPPO आणि Vivo च्या आकड्यांची आणि मार्केट शेयर्सची माहिती दिली आहे. आईडीसी च्या या रिपोर्ट मध्ये सर्व ब्रँड्सचा जुलै 2019 पासून नोव्हेंबर 2019 पर्यंत लेखाजोखा शेयर केला आहे. या रिपोर्ट मध्ये सर्वात जास्त हैराण करणारी बाब अशी कि Xiaomi आणि Samsung ने प्रत्येक महिन्याला प्रगती करत भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर Realme चा मार्केट शेयर खूप खाली आला आहे.

Xiaomi गेली पुढे

सर्वात आधी Xiaomi बद्दल बोलायचे तर जुलै 2019 मध्ये कपंनीचा ऑनलाईन मार्केट शेयर 42.09 टक्के होता. सप्टेंबर मध्ये फेस्टिवल सीजन मध्ये इतर ब्रँड्सचा चांगला सेल झाला त्यामुळे शाओमीला आपला मार्केट शेयर गमवावा लागला. सप्टेंबर मध्ये शाओमीचा ऑनलाईन मार्केट शेयर कमी होऊन 38.02 टक्के झाला. पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये शाओमीने चांगली परफॉर्मंस दिली आणि ऑनलाईन बाजारात Xiaomi ची हिस्सेदारी 43.82 टक्क्यांवरून 47.76 टक्के झाली. ओवरऑल मार्केट शेयर पाहता जुलै मध्ये Xiaomi चा मार्केट शेयर 28.36 टक्के होता जो नोव्हेंबर मध्ये 30.42 टक्के झाला .

Realme ची हालत झाली खराब

Realme ची स्थिती पाहता ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीचा ऑनलाईन मार्केट शेयर 29.13 टक्के होता पण वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर मध्ये रियलमीची ऑनलाईन बाजारात हिस्सेदारी कमी झाली आणि 7.32 टक्क्यांवर पोचली. ओवरऑल मार्केट शेयर बद्दल बोलायचे तर Realme ब्रँडने सप्टेंबर मध्ये 16.74 टक्के मार्केट शेयर मिळवून Samsung ला पण मागे टाकले होते आणि भारतातील दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनला होता. पण फक्त दोन महिन्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये रियलमीची घसरण होऊन 8.23 ओवरऑल मार्केट शेयर सह हि कंपनी दुसऱ्या क्रमकांवरून पाचव्या क्रमांकावर गेली.

अशी आहे इतर ब्रँड्सची स्थिती

इतर ब्रँड्स बद्दल बोलायचे तर Samsung चा सप्टेंबर मध्ये 16.19 टक्के ओवरऑल मार्केट शेयर होता जो नोव्हेंबर मध्ये वाढून 21.08 टक्के झाला. त्याचप्रमाणे सप्टेंबर मध्ये 14.31 टक्के ओवरऑल मार्केट शेयर वरून Vivo नोव्हेंबर मध्ये 16.92 टक्के ओवरऑल मार्केट शेयर मिळवून तिसऱ्या नंबर वर आला. तर सप्टेंबर मध्ये 11.88 टक्के ओवरऑल मार्केट शेयर मिळवणारा OPPO नोव्हेंबर मध्ये 11.12 टक्के ओवरऑल मार्केट शेयर सह चौथ्या नंबर वर राहिला.

ऑनलाईन मार्केट शेयर बद्दल बोलायचे तर Samsung कडे सप्टेंबर मध्ये 10.3 टक्के ऑनलाईन मार्केट शेयर होता जो नोव्हेंबर मध्ये वाढून 18.77 टक्के झाला. या यादीत तिसऱ्या क्रमांकावरील Vivo कडे सप्टेंबर मध्ये 9.59 टक्के ऑनलाईन मार्केट शेयर होता जो ऑक्टोबर मध्ये वाढून 12.69 टक्के झाला होता पण नोव्हेंबर मध्ये कमी होऊन 9.58 टक्के झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here