स्मार्टफोन मध्ये आज रोज रोज नवीन इनोवेशन दिसत आहेत. यातील काही तुम्हाला आवडतात पण काही तुम्हाला आवडत नाहीत. अशीच नापसंती लोक फोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक नसल्यावर दर्शवतात. सर्वात आधी ऍप्पल ने आईफोन मधून ऑडियो जॅक काढला होता. त्यांनतर अनेक दुसऱ्या कंपन्या ज्या एंडरॉयड फोन बनवत आहेत त्यांनी पण असेच केले. यात वनप्लस, हुआवई, शाओमी आणि आता सॅमसंगचे पण नाव आले आहे. सॅमसंग ने अपने गॅलेक्सी एम40 मधून 3.5एमएम ऑडियो जॅक काढून टाकला आहे जे मोबाईल यूजर्सच्या दृष्टीने चांगले नाही.
तुम्हाला असे वाटत असेल कि 3.5 एमएम ऑडियो जॅक नसेल तर जास्तीत जास्त तुम्हाला साधारण ईयरफोनचा वापर करता येणार नाही एवढेच नुकसान होईल. त्याने काय फरक पडेल? नवीन यूएसबी टाइप सी जॅक वाला ईयरफोन घेतल्यानंतर सर्व समस्या दूर होतील. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो कि फक्त एवढेच नुकसान नाही अजूनही खूप अडचणी येऊ शकतात. पुढे आम्ही अशाच 5 अडचणींचा उल्लेख केला आहे.
1. हेडफोन वेगळा विकत घ्यावा लागणार, जुना ईयरफोन होईल निरुपयोगी
3.5 एमएम ऑडियो जॅक ऑडियो प्रोडक्ट साठी एक स्टँडर्ड आहे आणि जवळपास सर्व ऑडियो प्रोडक्ट ज्यांचा वापर जास्तीत जास्त लोक करतात त्यात हाच जॅक असतो. त्यामुळे जवळपास प्रत्येकाकडे 1-2, 3.5 एमएम ऑडियो जॅक वाले प्रोडक्ट असतात. जर तुमच्या फोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक नसेल तर हे जुने ईयरफोन आणि हेडफोन निरुपयोगी ठरतील. आणि जरी सेल्स पॅक सह तुम्हाला यूएसबी टाइप-सी वाला ईयरफोन मिळाला तरी त्याचा वापर तुम्ही इतर प्रोडक्ट सोबत करू शकणार नाही.
2. ईयरफोन खरेदी होईल महाग
3.5 एमएम ऑडियो जॅक वाले ईयरफोन सध्या प्रत्येक बजेट मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही 300 रुपयांमध्ये चांगल्या ब्रँडचे ईयरफोन विकत घेता येतील. परंंतु जर तुमच्या फोन मध्ये ऑडियो सपोर्ट यूसएबी टाइप सी असेल तर मग ईयरफोन साठी किंमत थोडी थोडी जास्त द्यावी लागेल. इतकेच नव्हे तर ऑप्शन पण कमी होतील.
3. कार आणि घरात वापरता येणार नाही ऑक्स केबल
तुम्ही कार मध्ये जात असाल किंवा घरात गाणी ऐकत असाल. दोन्ही म्यूजिक प्लेयर मध्ये ऑक्स सपोर्ट असतो ज्यात 3.5 एमएम ऑडियो जॅक फोनशी कनेक्ट करता येतो आणि इससह फोन मधील गाणी स्पीकर किंवा घरातील म्यूजिक प्लेयर मध्ये ऐकता येतात. परंतु फोन मध्ये यूएसबी टाइपसी कनेक्टर असल्यास असे करता येत नाही. वेगळा कनेक्टर सोबत बाळगावा लागतो.
4. गेम खेळताना किंवा गाणी ऐकताना फोन करता येणार नाही चार्ज
जेव्हा फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक सपोर्ट असतो तर तुम्ही गाणी ऐकताना किंवा गेम खेळताना पण फोन चार्ज करता येतो. परंतु यूसएबी टाइप-सी वाले फोन सह असे करता येत नाही. किंवा मग असे म्हणूया ऍप्पल च्या लाइटनिंग चार्जर वाल्या फोन सोबत असे नाही. तुम्ही एकावेळी एकतर फोन चार्ज करू शकता किंवा गाणी ऐकू शकता. 3.5 एमएम ऑडियो जॅक नसल्यास हाच एक मोठा तोटा आहे.
5. ब्लूटूथ कनेक्टिविटी मुळे बॅटरी जास्त वापरली जाते
3.5-एमएम ऑडियो जॅक नसल्यामुळे बऱ्याचदा लोक गाणी ऐकण्यासाठी ब्लूटूथ डिवाइसचा वापर करतात. पंरतु ब्लूटूथ कनेक्टिविटीचे दोन तोटे आहेत. एक फोनचा बॅटरी बॅकअप कमी होईल आणि फोन सोबत तुम्हाला ब्लूटूथ हेडफोन पण वारंवार चार्ज करावा लागतो. तर दुसरा तोटा असा कि वायरलेस कनेक्टिविटी मध्ये ऑडियो क्वालिटी ती मिळत नाही जी वायर मधून मिळते.
सध्या अनेक कंपन्या ज्या 3.5 एमएम ऑडियो जॅक देत नाहीत त्या यूएसबी टाइप सी-3.5 एमएम ऑडियो कनेक्टर देतात. ज्यातून तुम्ही यूएसबी टाइप सी पोर्ट असलेल्या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक वापरू शकता. परंतु तुम्ही प्रत्येक ठिकाणी तो छोटा कनेक्टर घेऊन जाऊ शकत नाही. तसेच तो हरवण्याची पण शक्यता असते.



















