PUBG समवेत 118 चायनीज ऍप भारतात झाले बॅन, इथे बघा संपूर्ण यादी

भारत सरकार द्वारे चायनीज ऍप्स बॅन करण्याची मालिका थांबत नाही आहे. यावर्षी जूनच्या शेवटी 59 चीनी ऍप्स बॅन केल्यानंतर भारतात पबजी समवेत 118 ऍप्स बॅन करण्यात आले आहेत. प्रसिद्ध ऑनलाइन गेम PUBG व्यतिरिक्त CamCard, Baidu, Cut Cut, VooV, Tencent Weiyun, Rise of Kingdoms आणि Zakzak सारख्या ऍप्सचा समावेश पण आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनचे दोन सर्वात लोकप्रिय ऍप Baidu Search आणि Weibo पण सरकारने ब्लॉक केले होते. बॅन नंतर आता यातील कोणताही ऍप गूगल प्ले स्टोर आणि ऍपल ऍप स्टोर वरून डाउनलोड करता येणार नाही.

चीन विरुद्ध अजून डिजिटल स्ट्राइक करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रेस रीलिज प्रसिद्ध केली आहे. यात सरकारने बॅन केलेल्या त्या 118 ऍप्सची नावे देण्यात आली आहेत. सरकारने या निर्णयामागे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगितले आहे. प्रतिबंधित ऍप्सच्या यादीत पबजी व्यतिरिक्त अनेक लोकप्रिय ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. लिस्ट मध्ये पबजी मोबाईल लाइट, बायडू, सुपर क्लीन, शायोमीचा शेयरसेव, वीचॅट वर्क, साइबर हंटर आणि त्याचा लाइट वर्जन, गेम ऑफ सुल्तान्स, गो एसएमएस प्रो, मार्वेल सुपर वॉर इत्यादींचा समावेश आहे.

इथे बघा बॅन झालेल्या 118 चीनी ऍप्सची यादी

भारतीय सैन्याने बॅन केले हे ऍप्स

अलीकडेच भारतीय सैन्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Facebook, Instagram, Truecaller, आणि PUBG सहित 89 ऍप वर बंदी घातली आहे. या ऍप्समुळे सौन्याला फक्त साइबर घुसखोरीची भीती नाही तर माहिती फुटण्याची पण चिंता आहे. सरकारने 59 चीनी ऍप्स वर बंदी घातली होती. पण आर्मीने बंदी घातलेल्या ऍप्सची यादी थोडी मोठी आहे आणि यात लोकप्रिय ऍप जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम व डेटिंग ऍप टिंडरचा पण समावेश आहे.

TikTok समवेत या 59 चाइनीज ऍप्स वर आधीच आहे बॅन

जूनच्या शेवटी बॅन झालेल्या 59 चिनी ऍप्सच्या यादीत TikTok व्यतिरिक्त BigoLive आणि WeChat सोबत Truecaller, Zoom and Vigo Video ऍप्सचा समावेश आहे. हे चीनी ऍप्स फक्त इंटरटेनमेंट कॅटेगरी मध्ये नाहीत. यात चॅट ऍप्स, टूल ऍप्स आणि काही गेम्सचा पण समावेश आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here