Snapdragon 8 Gen 2 चिपसेट असलेला iQOO 11 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवरून होईल विक्री

Vivo च्या सब-ब्रँड iQOO नं आपला नवीन iQOO 11 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. याआधी चीनमध्ये आलेला हा स्मार्टफोन आता भारतीयांच्या भेटीला आहे. विशेष म्हणजे हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Qualcomm चा लेटेस्ट फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आहे. त्यामुळे हा हँडसेट वनप्लससाठी दमदार पर्याय ठरू शकतो. तसेच या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा मिळतो.

iQOO 11 5G ची भारतीय किंमत

iQOO 11 स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत 59,999 रुपयांपासून सुरु होते, ही 8GB रॅम व 256GB मॉडेलची किंमत आहे. तर फोनचा 16GB रॅम व 256GB मॉडेल 64,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जर तुम्ही HDFC आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला 5,000 रुपयांची थेट सूट मिळेल. iQOO 11 ची विक्री 13 जानेवारीपासून अ‍ॅमेझॉन आणि iQOO.com वर सुरु होईल.

iQOO 11 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले
  • 144Hz रिफ्रेश रेट
  • 16GB RAM + 256GB storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 120W fast charging

iQOO 11 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 2K अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो LTPO 4.0 टेक्नॉलॉजी, 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशियो, HDR10+ आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच यात 1.07 बिलियन कलर्स, DCI-P3 कलर गामुट, 1800 नीट्स पीक ब्राईटनेस आणि 1440Hz PWM डीमींग सपोर्ट मिळतो.

iQOO 11 भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Qualcomm चा लेटेस्ट्स आणि शक्तिशाली Snapdragon 8 Gen2 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी कंपनीनं Adreno GPU चा वापर केला आहे. जोडीला कंपनीची कस्टम V2 चिप देखील देण्यात आली आहे. हा फोन Android 13 आधारित Funtouch OS वर चालतो. फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज मिळते.

iQOO 11 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात फोनमध्ये 50MP ISOCELL GN5 कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो गिंबल टेक्नॉलॉजीसह येतो. त्याचबरोबर बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो व पोर्टरेट लेन्स तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा आयकू फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी iQOO 11 मध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, त्यामुळे हा फोन 0 ते 50 टक्के फक्त आठ मिनिटांत चार्ज होतो. सिक्योरिटीसाठी यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच या फोनमध्ये इन्फ्रारेड सेन्सर, हायफाय ऑडिओ, स्टिरियो स्पीकर आणि यूएसबी टाइप सी ऑडिओ मिळतो. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11, ब्लूटूथ 5.3, जीपीएस, यूएसबी टाइप सी आणि एनएफसी असे पर्याय मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here