Oppo Reno 12 आणि 12 Pro कधी होऊ शकतो लाँच, ही माहिती आली समोर

ओप्पोच्या रेनो सीरिजमध्ये आता 12 नंबर जोडणार आहे. ब्रँडद्वारे गेल्यावर्षी प्रमाणे यावेळी पण दोन फोन Oppo Reno 12 आणि Oppo Reno 12 Pro नावाने बाजारात एंट्री घेणार आहेत. परंतु अजून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे, याआधी ही लीकमध्ये स्मार्टफोनच्या लाँचच्या टाईमलाईनची माहिती समोर आली आहे. सांगण्यात आले आहे की दोन मोबाईल सोबत काही इतर प्रोडक्ट पण येणार आहेत. चला, पुढे सविस्तर जाणून घेऊया माहितीमध्ये काय शेअर करण्यात आले आहे.

Oppo Reno 12 आणि Oppo Reno 12 Pro लाँच टाईमलाईन (लीक)

  • ओप्पोच्या या दोन्ही फोनबद्दल ही माहिती टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनद्वारे मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबोवर सांगितली आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की Oppo Reno 12 आणि Oppo Reno 12 Pro मोबाईलच्या मे किंवा जूनच्या सुरुवातीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • रेनो 12 मोबाईलसह Oppo Pad 3 आणि Enco X3 सारखे नवीन गॅजेट पण लाँच होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
  • टिपस्टरने सांगितले आहे की वरती दिलेल्या प्रोडक्ट्सवर काम केले जात आहे आणि याला लवकर आणले जाऊ शकते.
  • तसेच या लीकमध्ये तारीख स्पष्ट नाही परंतु हा डिव्हाईस मे च्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सादर होऊ शकतो.

Oppo Reno 12 सीरिजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: रिपोर्टनुसार Oppo Reno 12 सीरिजच्या दोन्ही फोनमध्ये चारही बाजूला मायक्रो कर्वेचर असलेला OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यावर 1.5K पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: ओप्पो रेनो 12 मध्ये युजर्सना MediaTek Dimensity 8200 चिपसेट मिळणार असल्याची चर्चा आहे. तर ओप्पो रेनो 12 प्रो डिव्हाईसमध्ये MediaTek Dimensity 9200 Plus प्रोसेसर असू शकतो.
  • कॅमेरा: ओप्पो रेनो 12 मध्ये 50-मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड आणि 50-मेगापिक्सल 2x टेलीफोटो ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच, ओप्पो रेनो 12 प्रो मध्ये पण एक समान ट्रिपल कॅमेरा आणि लेन्स दिली जाऊ शकते. जर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही फोनमध्ये ऑटोफोकसला सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: Oppo Reno 12 आणि Oppo Reno 12 Pro फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here