फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5200एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि 6.78 इंच डिस्प्ले असलेला हा शानदार स्मार्टफोन

Infinix ने या महिन्याच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपल्या ‘हॉट सीरीज’ चा विस्तार करत Infinix Hot 10 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन 5200एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेऱ्यासह आला होता ज्याने फक्त 9,999 रुपयांमध्ये एंट्री घेतली होती. शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आता अजून स्वस्त करत कंपनीने इनफिनिक्स हॉट 10 चा अजून एक नवीन वेरिएंट मार्केट मध्ये आणला आहे. हा नवीन वेरिएंट फक्त 8,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Hot 10 चा हा नवीन वेरिएंट कंपनीने 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. येत्या 29 ऑक्टोबर पासून हा नवीन वेरिएंट शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल, जिथे Ocean Wave, Amber Red, Obsidian Black आणि Moonlight Jade कलर मध्ये विकत घेता येईल. तसेच इनफिनिक्स हॉट 10 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये खरीदसाठी उपलब्ध आहे.

Infinix Hot 10

इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे तसेच या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे.

Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/1.85 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआई लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हि बॅटरी पावर मॅरेथॉन टेक्नोलॉजी सह येते जी बॅटरी लाइफ 25 टक्क्यांनी वाढवते.

व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here